Navratri 2022
Navratri 2022  
टूरिझम

Navratri 2022 : नवरात्रीचा आनंद घेण्यासाठी पर्यटनाचा प्लॅन करताय?, 'या' ठिकाणी जरुर जा..

सकाळ डिजिटल टीम

भारतात नवरात्रीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. विशेषतः शारदीय नवरात्रीमध्ये (शारदीय नवरात्री 2022) दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. तसेच पूजेसाठी मंडप उभारले जातात. देशातील अनेक ठिकाणी गरबा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दुर्गा मातेची अनेक ठिकाणी भव्य पद्धतीने मंदिरे सजवली जातात.

यंदा शारदीय नवरात्री 25 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान साजरा होता असून यादरम्यान अनेक सुट्ट्या आहेत. या दिवसांत तुम्हाला नवरात्रीचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणांना भेट देवू शकता. आम्ही तुम्हाला हा सण अनुभवण्यासाठी काही उत्तम ठिकाणांची माहिती सांगत आहोत. या ठिकाणी तुम्ही भेट दिला तर कधीही नवरात्रीचा प्रसंग विसरणार नाही...

कोलकाता

नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी कोलकाता हे एक उत्तम ठिकाण आहे. नवरात्रीच्या काळात, पश्चिम बंगालच्या प्रत्येक कोपऱ्यात दुर्गा देवीच्या मोठ्या मूर्ती बनवता येतात. त्या मोठ्या पंडालमध्ये ठेवल्या जातात. कोलकात्यात नवरात्रोत्सव दुर्गा पूजा किंवा दुर्गोत्सव म्हणून ओळखला जातो.

अहमदाबाद

गुजरातमधील नवरात्र हा जगातील सर्वात मोठा पारंपरिक नृत्य उत्सव आहे. या 9 दिवसांमध्ये गुजराती लोक चमकदार रंगाच्या कपड्यांमध्ये दांडिया आणि गरबाच्या तालावर नाचताना दिसतात. इथे गरबा नाईटला नक्की जावं असं सांगितलं जातं.

वाराणसी

वाराणसी हे उत्तर प्रदेशातील सर्वात पवित्र शहरांपैकी एक आहे. येथे नवरात्रोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. येथे हजारो दिवे वाराणसीच्या घाटांना प्रकाशित करतात. रामचरितमानसचे मंत्र दहा दिवस संपूर्ण शहरात गुंजतात. उत्तर प्रदेशातील नवरात्रीतीत रामलीला हा एक नृत्य प्रकार सर्वाधिक लोकप्रिय आहे. ते पाहण्यासाठी दरवर्षी लाखो लोक येतात.

म्हैसूर

नवरात्रीच्या दरम्यान कर्नाटकला भेट देण्याचे मुख्य कारण म्हणजे हजारो दिव्यांनी उजळून निघालेल्या म्हैसूर रॉयल पॅलेसला भेट देणे. दसऱ्याला येथे नधब्बा सण म्हणूनही ओळखले जाते. हा दहा दिवसांचा उत्सव आहे. ज्यामध्ये संपूर्ण म्हैसूरमध्ये अनेक नृत्यांचे प्रकार सादर केले जातात आणि गायनही होते.

वैष्णो देवी मंदिर जम्मू काश्मीर

नवरात्रीच्या काळात माता राणीचा दरबार म्हणजेच श्री वैष्णोदेवी मंदिराची सजावट केली जाते. यानिमित्त लाखो लोक दर्शनासाठी येतात. कतारपासून 14 किमी अंतरावर उंच टेकडीवर असलेल्या वैष्णो देवी धाममध्ये 9 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा अद्भूत सोहळा स्वत: अनुभवने म्हणजेच कोणत्याही उत्सवापेत्रा कमी नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaish e Mohammed: जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट, निकाल देताना दिला रशियन लेखकाचा दाखला

Justice Chitta Ranjan Das: आज मला खरं सांगायला हवं... निवृत्तीच्या दिवशी RSS बद्दल न्यायमूर्ती असे का म्हणाले?

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियाचे शेअर्स वधारले, नेस्लेचा शेअर घसरला

Star Sports Hits Back Rohit Sharma : 'हिटमॅन' रोहित शर्माच्या आरोपांवर स्टार स्पोर्ट्सने केला पलटवार; म्हणाले...

Gold Rate: सोने-चांदी तोडणार सर्व रिकॉर्ड? इराण ठरणार कारणीभूत; जाणून घ्या भाव

SCROLL FOR NEXT