Vaishno Devi Trip Tips | Travelling Essential sakal
टूरिझम

Vaishno Devi Temple : वैष्णो देवी ट्रिप प्लॅन करताय? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा, प्रवास होईल सुखद

Vaishno Devi Yatra Guide: वैष्णो देवीच्या यात्रेची तयारी करताय? तर ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

Anushka Tapshalkar

Best Time to Visit Vaishno Devi to Avoid Crowd: मागच्या महिन्यात जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे तेथील आणि हिमाचल प्रदेशातील पर्यटन कमी झाले होते. याचा मोठा फटका वैष्णो देवी पर्यटन व्यवसायालाही लागला. पण हळूहळू आता हा व्यवसाय पुन्हा मार्गी लागत आहे.

जर तुम्ही वैष्णो देवीच्या यात्रेचा विचार करत असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी आधी जाणून घेणे आवश्यक आहे. या माहितीमुळे तुमची यात्रा आरामदायक, सुरळीत होईल.

वैष्णो देवी मंदिर

वैष्णो देवी मंदिर जम्मू-काश्मीरमधील त्रिकूट पर्वतावर असलेले एक अत्यंत पवित्र हिंदू मंदिर आहे. इथे माता दुर्गेच्या एका रुपाचे मंदिर आहे. इथे तीन पिंडी आहेत ज्या माता काली, सरस्वती आणि लक्ष्मींचे प्रतिनिधित्व करतात. देश विदेशातून अनेक भाविक इथे दर्शन घेण्यासाठी चालत जातात किंवा हेलिकॉप्टरचा उपयोग करतात.

भक्तांचा विश्वास आहे की या मंदिरात दर्शन केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यात सुख-शांती प्राप्त होते. मंदिराजवळ राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे आणि येथे येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी ही यात्रा अत्यंत पवित्र आणि आनंददायक असते. तुम्हीही वैष्णो देवीची ट्रिप प्लॅन करत असाल तर पुढे दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा.

दिल्लीहून वैष्णो देवी प्रवास

दिल्लीसह देशभरातील भक्त आता परत वैष्णो देवीच्या दर्शनासाठी उत्सुकतेने निघत आहेत. वैष्णो देवीची यात्रा सुरू करण्यासाठी तुम्ही दिल्लीहून ट्रेन, बस किंवा कारने प्रवास करू शकता. दिल्लीपासून कटरा हा ट्रेन प्रवासाचा मुख्य मार्ग आहे, ज्यासाठी तुम्हाला अनेक ट्रेन्सचा पर्याय मिळेल जसे की जम्मू मेल, वंदे भारत एक्सप्रेस इत्यादी. दिल्लीपासून सुमारे 650 किलोमीटर अंतरावर वैष्णो देवीचे मंदिर आहे. कटरा येथे पोहोचल्यानंतर तुम्ही हेलिकॉप्टरने किंवा पायवाटेने वैष्णो देवीला भेट देऊ शकता.

कटरा ते वैष्णो देवी - हेलिकॉप्टर सेवा

गेल्या काही काळात, भारत-पाकिस्तानच्या तणावामुळे कटरा ते वैष्णो देवी हेलिकॉप्टर सेवा बंद होती. मात्र आता ती सेवा पुन्हा सुरु झाली आहे. यातून भाविकांना एका दिवसात जाऊन परतण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. त्यामुळे वेळेची बचत होते आणि कष्टही कमी होतात.

गर्दी टाळण्यासाठी कधी आणि कसे जावे?

सण-उत्सवाच्या काळात, खासकरून नवरात्रीमध्ये वैष्णो देवी मंदिरात खूप गर्दी होते. त्यामुळे गर्दी टाळायची असेल तर तुम्ही उन्हाळा किंवा पावसाळ्याचा काळ निवडू शकता. पण पावसाळ्यात हवामान कसे आहे हे पाहूनच जायचे ठरवा, म्हणजे सुरक्षित राहील. तसेच, सकाळी लवकर उठून सूर्योदयाच्या आधी मंदिरात पोहोचलात तर तुम्हाला कमी गर्दीत आणि शांततेत दर्शन घेता येईल.

मंदिरात दर्शनासाठी आधी ऑनलाइन नोंदणी करणे फार गरजेचे आहे. मंदिरात पोहोचल्यावर थेट नोंदणी करताना तुम्हाला मोठ्या रांगेत वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे www.maavaishnodevi.org या अधिकृत वेबसाइटवरून यात्रेच्या तारखेच्या आधी नोंदणी करून कागदपत्रे तयार ठेवा. नोंदणी सहसा 4 ते 60 दिवस आधी सुरु होते. तसेच हेलिकॉप्टर सेवा आणि बस प्रवासासाठी देखील तिकीट आधीच बुक करून ठेवले तर फायद्याचे ठरेल.

कुठे थांबावे?

श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाने कटरा शहरात भक्तांसाठी राहण्याची चांगली सोय केली आहे. इथे ‘निहारिका यात्री निवास’, ‘शक्ती भवन’ आणि ‘आशीर्वाद भवन’ या ठिकाणी तुम्ही राहण्याची सोय करू शकता. शिवाय जम्मू इथे ‘वैष्णवी धाम’, ‘कालिका धाम’ सारखे देखील निवासस्थान आहेत. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तुम्ही जवळचं भैरवनाथ मंदिर, भीमगड किल्ला आणि डेरा बाबा मंदिर ही धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणंही पाहू शकता.

यात्रा करताना कोणकोणत्या वस्तू सोबत ठेवल्या पाहिजेत?

वैष्णो देवीचे तापमान थोडे थंड असू शकते, त्यामुळे गरजेनुसार उबदार कपडे घ्यावेत. तसेच, थोडी औषधे (जसे सर्दी, खोकला, ताप यासाठी), आरामदायक चप्पल, टॉर्च, आणि लहान मुलांसाठी स्नॅक्स सोबत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. पायऱ्या चढताना आरामदायक आणि मजबूत फूटवेअर वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT