gilbert hill mumbai
gilbert hill mumbai sakal
टूरिझम

आवर्जून पाहावं अद्‍भुत आश्चर्य!

प्रशांत ननावरे

मुंबई उपनगरातील अंधेरी पश्चिमेला चालत अवघ्या एक किलोमीटर अंतरावर ज्वालामुखीच्या उद्रेकापासून निर्माण झालेली गिल्बर्ट हिल नामक टेकडी आहे.

मुंबई उपनगरातील अंधेरी पश्चिमेला चालत अवघ्या एक किलोमीटर अंतरावर ज्वालामुखीच्या उद्रेकापासून निर्माण झालेली गिल्बर्ट हिल नामक टेकडी आहे. मुंबई महापालिकेने आता या टेकडीचा पर्यटन क्षेत्रांच्या यादीत समावेश केला आहे. फक्त त्यामुळेच नाही तर सुमारे २०० फूट उंच ही टेकडी जागतिक आश्चर्य का समजली जाते, हे जाणून घेण्यासाठी गिल्बर्ट हिलला भेट देणं गरजेचं आहे.

बिनमहत्त्वाच्या आणि बिनकामाच्या एखाद्या व्यक्तीची सहज दगडासोबत तुलना केली जाते; पण दगड निर्जीव वस्तू असली तरी खरंच इतका कर्तव्यशून्य असतो का? अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपैकी निवाऱ्याची निर्मिती करताना दगड महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हाच दगड आपल्याला सुरक्षित ठेवत असतो. दगडाचे इतके गुणगान गाण्याचे कारण म्हणजे आज आपण एका प्रागऐतिहासिक काळातील दगडाला भेट देणार आहोत. बेटांपासून तयार झालेल्या मुंबईत हा दगड कोट्यवधी वर्षे उभा आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे वयोमान आणि महत्त्व लक्षात आले असले तरी त्याआधी बहुतांश दगड तथाकथित विकास घडवणाऱ्या लोकांनी गिळंकृत केला आहे. तरी जितका दगड आता शिल्लक आहे, त्याला प्रत्येक मुंबईकरांनी लवकरात लवकर भेट द्यायला हवी. ही जागा म्हणजे गिल्बर्ट हिल.

मुंबई उपनगरातील अंधेरी पश्चिमेला चालत अवघ्या एक किलोमीटर अंतरावर ज्वालामुखीच्या उद्रेकापासून निर्माण झालेली गिल्बर्ट हिल नामक टेकडी आहे. अनेक वर्षे या टेकडीभोवती झोपड्यांचे साम्राज्य पसरले होते. नागरिक आणि सरकारकडून दुर्लक्षित असलेल्या या टेकडीचे महत्त्व आणि वेगळेपण वारंवार पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी पुढे आणल्यानंतर आता मुंबई महापालिकेने या टेकडीचा पर्यटन क्षेत्रांच्या यादीत समावेश केला आहे. परंतु फक्त पर्यटनाच्या यादीत समावेश केल्यामुळे नाही तर सुमारे २०० फूट उंच ही टेकडी जागतिक आश्चर्य का समजली जाते, हे जाणून घेण्यासाठी तिला भेट देणं गरजेचं आहे.

गिल्बर्ट हिलपर्यंत पोहचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे चालत जाणे. एक किलोमीटरची चाल आहे, पण गुगल मॅपवर टाकल्यास ती तुम्हाला थेट टेकडीच्या पायथ्याशी घेऊन जाईल. कारण टेकडीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असून रिक्षावाले तिथे जाण्यास तयार होत नाहीत आणि स्वत:ची मोठी गाडी घेऊन जाणे, ती पार्क करणे हे थोडे जिकीरीचे काम आहे.

मुंबईमध्ये एकेकाळी मोठ्या प्रमाणात डोंगर-टेकड्या होत्या. कालौघात त्यांचे सपाटीकरण झाले असून काही मोजक्या टेकड्या शिल्लक आहेत. मायानगरी मुंबई ज्या जन्मखुणा आजही आपल्या अंगावर मिरवते हाच मुंबईचा भूशास्त्रीय वारसा आहे. ज्यामध्ये गिल्बर्ट हिलचादेखील समावेश होतो. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील राष्ट्रीय स्मारक असलेल्या डेव्हील्स टॉवरशी साधर्म्य साधणारी गिल्बर्ट हिल टेकडी ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हा थंड होऊन निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकापासून बनली आहे. अमेरिकन भूशास्त्रज्ञ ग्रोवर कार्ल गील्बर्ट यांनी या दगडांच्या रचनांचा अभ्यास करून त्यांच्या जन्माची उकल करणारे गृहितक मांडल्यामुळे त्यांच्या नावे ही टेकडी ओळखली जाते. दुरून ही टेकडी पाहताना दगडाचे चौकोनी काप एकमेकांना जोडावेत अशी तिची रचना आहे. टेकडीच्या जवळ जाऊन कित्येक कोटी वर्षांपूर्वी तयार झालेला दगड हात लावून अनुभवता येतो. मानवी उत्क्रांतीच्याही आधी तयार झालेल्या या दगडाला म्हणूनच नगण्य समजता कामा नये.

गिल्बर्ट टेकडीवर श्री गावदेवी दुर्गामातेचे मंदिर आहे. मंदिराला भेट देण्यासाठी तब्बल दोनशे पायऱ्या चढून वर जावे लागते. टेकडीच्या माथ्यावरील हे मंदिर खरंतर अतिक्रमणच म्हणावे लागेल. मंदिरापर्यंत जाण्यासाठीच्या पायऱ्या चढत जसे तुम्ही वर जाता तशी या टेकडीची उंची लक्षात यायला लागते. पायऱ्या चढून वर गेल्यावर तुम्ही थेट मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करता. सिमेंट-काँक्रिटीकरण आणि झाडे लावून टेकडीवरील परिसर सजविण्यात आला आहे. लोकांना बसण्यासाठी बाकं, चालण्यासाठी वाटा आणि वाटेवर दिवे लावलेले दिसतात. टेकडीचा माथा फारच लहान आहे, त्यामुळे मंदिराच्या भोवती फेरी मारून तुम्ही सर्व बाजूंनी टेकडी फिरू शकता. टेकडीच्या माथ्यावर चारही बाजूंना कुंपण घातलेले आहे. कुंपणाच्या पलिकडे वरून खाली गेलेल्या काही तारा दिसतील. या तारा टेकडीला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी आहेत. टेकडीच्या आजूबाजूला झालेल्या बांधकामामुळे टेकडीला हादरे बसून टेकडीचा काही भाग कोसळत होता, म्हणून ही उपाययोजना केलेली. माथ्यावरून गगनाला भिडणाऱ्या इमारती आणि झोपडपट्टी नजरेस पडते. पश्चिम दिशेला समोर पाहिल्यास उंचच उंच इमारती आणि त्याच्या पलिकडे अथांग पसरलेला अरबी समुद्र दिसतो. एकूणच काळ आणि निसर्गावरील माणसाच्या अतिक्रमणाची झलक या टेकडीवरून दिसते.

सहकुटुंब पिकनिकला किंवा पर्यटनासाठी जाण्याची ही जागा नाही. मात्र मुंबईसारख्या सिमेंट काँक्रिटच्या जंगलात हे नैसर्गिक आश्चर्य आहे. ज्यांना भूरचनाशास्त्र या विषयामध्ये रस आहे किंवा मुंबईतील नेहमीच्या पर्यटन स्थळांपेक्षा वेगळं काहीतरी पाहण्याची इच्छा आहे, त्यांनी गिल्बर्ट हिलला नक्की भेट द्यावी.

nanawareprashant@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT