Ram Navami 2023  esakal
टूरिझम

Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामांनी अयोध्या ते श्रीलंका कसा केला प्रवास? आजही पहायला मिळतात ती ठिकाणे!

प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेचे आयुष्य बदलणारे पंटवटी स्थान महाराष्ट्रात आहे

Pooja Karande-Kadam

प्रभू श्रीरामांचा जन्मकाळ आज आहे. देशभरातील लाखो भक्त हा उत्सव साजरा करत आहेत. या दिवशी देशातील सर्वच मंदिरांमध्ये प्रभू श्री रामांचा जयजयकार होत आहे. श्री रामांचा जन्म अयोध्येत झाला तरी त्यांनी वनवासात केलेल्या भ्रमंतीमूळे अवघी भारतभूमीच त्यांच्या सहवासाने पावन झाली आहे.

श्री राम अयोध्या नगरीचे राजे होते. पण तरीही त्यांना वनवास भोगावा लागला होता. माता कौसल्याच्या हट्टापाई श्री राम, लक्ष्मणजी आणि सीता मातेला वनवासाला जावं लागलं. अयोध्येतून सुरू झालेला हा प्रवास श्रीलंकेमध्ये जाऊन संपला. भारतातील ज्या ज्या ठिकाणी श्रीरामांनी भ्रमण केलं त्या त्या ठिकाणी आजही त्यांच्या पाऊलखूणा आहेत.

आज रामनवमीच्या दिवशी त्याच ठिकाणांची सैर आपण करूया. प्रभू श्रीरामांची आणि जटायूची भेट कुठे झाली, ते प्रयागमध्ये नक्की कुठे होते? या अशाच प्रश्नांची उत्तरे आज जाणून घेऊयात.  

जनकपूर

जनकपूर हे राजा जनकाची कन्या सीतेचे जन्मस्थान असल्याचे म्हटले जाते. जनकपूर हे ठिकाण होते जेथे श्री रामांचा सीता मातेशी विवाह झाला होता. सध्याचे, जनकपूर हे काठमांडूपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे.

जनकपूरमधील पॅलेस

प्रयागराज

पूर्वी अलाहाबाद म्हणून ओळखले जाणारे प्रयाग हे हिंदू धर्मातील महत्त्वाचे स्थान आहे. प्रभू श्री राम, देवी सीता आणि लक्ष्मण यांना १४ वर्षांच्या वनवासात पाठवण्यात आले. तेव्हा त्यांनी प्रयागमधीलच पवित्र गंगा नदी पार केली होती. प्रयागराज हे गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमाचेही ठिकाण आहे.

प्रयागराजमधील कुंभमेळा

चित्रकूट

चित्रकूट हे एक महत्त्वपूर्ण स्थान मानले जाते. याच ठिकाणी श्री रामांनी पिता दशरथ यांच्या मृत्यूची बातमी समजली होती. दशरथांच्या निधनाची बातमी घेऊन बंधू भरत रामचंद्रांच्या भेटीला आले होते. तेव्हा वनवास संपवून माघारी फिरण्याची विनंतीही भरत यांनी श्री रामांना केली होती. सध्याचे चित्रकूट हे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यांमध्ये वसलेले आहे आणि भक्तांसाठी भगवान रामाला समर्पित मंदिरांनी भरलेले आहे.

चित्रकूट धाम

पंचवटी

पंचवटी येथे घडलेल्या घटनांनी भगवान राम, देवी सीता आणि लक्ष्मण यांचे जीवन बदलून गेले. म्हणून हे रामायणातील एक महत्त्वाचे स्थान असल्याचे म्हटले जाते. लक्ष्मणाने याच वनात शुर्पणखाचे नाक कापले होते. त्या बदल्यात रावणाने देवी सीतेचे येथून अपहरण केले होते. पंचवटीला नाशिक म्हणून ओळखले जाते आणि ते महाराष्ट्रात आहे. तुम्ही येथील लोकप्रिय पंचमुखी हनुमान मंदिरालाही अवश्य भेट द्या.

पंचवटी

अशोक वन    

रावणाने देवी सीतेचे अपहरण करून त्यांना श्रीलंकेत नेल्यानंतर सीतामातेने रावणाच्या महालात राहण्यास नकार दिला. त्या अशोकांच्या झाडाच्या वनात राहू लागल्या. म्हणून तिला अशोक वाटिका असे म्हणतात. सध्या हे ठिकाण श्रीलंकेच्या नुवारा एलिया शहराजवळील हकागाला बोटॅनिकल गार्डनमध्ये असल्याचे सांगितले जाते.

अशोक वाटीका

रामेश्वरम

भारत आणि लंकेला जोडणारा रामसेतू याच ठिकाणी उभारण्यात आला होता. लंकेत जाण्यासाठी भगवान रामाच्या वानरांच्या सैन्याने रामेश्वरम येथे राम सेतू बांधला. सीतेने लंकेहून परतल्यावर येथे शिवलिंग बांधले असे मानले जाते. रावणाचा वध केल्यानंतर भगवान रामानेही येथे शिवाची प्रार्थना केली होती.

रामेश्वरम धाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT