Ramayana Circuit Train Twitter
टूरिझम

दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून रवाना होणार पहिली 'रामायण सर्किट ट्रेन'

सकाळ डिजिटल टीम

प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या आणि त्यांच्या कर्तृत्वाशी संबंधित असलेली प्रमुख ठिकाणे पाहण्यासाठी भारतीय रेल्वेने 'रामायण सर्किट ट्रेन' (Ramayana Circuit Train)सुरू केली आहे. ही रेल्वे आजपासुन रविवार (ता.७) दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून सुटेल. ही ट्रेन अयोध्येसह देशातील विविध ठिकाणी जाणार आहे.

धार्मिक पर्यटनाला चालना मिळावी तसेच कोरोना कालावधीत बंद झालेले पर्यटन सुरळीत व्हावे यासाठी भारत सरकारची "स्वदेश दर्शन योजना" ही योजना सुरु केल्याची माहिती ट्टिट करत इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) दिली आहे. ही ट्रेन 17 दिवसांच्या प्रवासात अयोध्या, सीतामढी आणि चित्रकूटसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जाणार आहे.

'आईआरसीटीसी' ने दिलेल्या माहितीनुसार, या डिलक्स एसी ट्रेनमध्ये फर्स्ट एसी आणि सेकंड एसी असे दोन प्रकारचे डबे आहेत. ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, प्रत्येक डब्यात सुरक्षा रक्षकाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच ट्रेनमध्ये दोन डायनिंग रेस्टॉरंट, किचन, शॉवर रूम अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. याशिवाय अजून चार गाड्याही सुरू होतील अशी माहिती दिली आहे.

दक्षिण भारतातील धार्मिक पर्यटनासाठी ही ट्रेन मदुराईहून निघेल. हंपी, नाशिक, चित्रकूट, अलाहाबाद, वाराणसी करत परत मदुराईला परतेल. ही गाडी १६ नोव्हेंबरला सुटेल. श्री रामायण यात्रा एक्सप्रेस-श्री गंगानगर 25 नोव्हेंबरला निघणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT