टूरिझम

विदर्भ पर्यटनासाठी समृद्ध; काही नियम, माहिती कायम लक्षात ठेवा

नीलेश डाखोरे

नागपूर : महाराष्ट्रासह विदर्भही पर्यटनासाठी समृद्ध (Vidarbha is rich for tourism) आहे. विदर्भात अनेक अशी ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी दोन-तीन दिवसांच्या सुटीत परिवारासह जाऊन येता येते. जंगल सफारीची (Jungle safari) आवड असणाऱ्यांसाठी येथे विविध अभयारण्य आहेत. पेंच, ताडोबा, नागझिरा, नवेगाव बांध, मेळघाट यांच्यासह आणखीही छोटे मोठे अभयारण्य पर्यटकांना आकर्षित करतात. भारतासह विदेशी पर्यटकही येथे मोठ्या प्रमाणात भेट (Tourists also visit in large numbers) देतात. येथे मुक्कामासाठी विविध पर्यटन कंपन्यांद्वारे जागा आरक्षित केली जाते. (Remember-the-rules-and-information-before-to-go-for-tourism)

सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. या दिवसांत अनेकजण सहलीला किंवा जंगल सफारीचा बेत आखतात. तसेच लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेजेस बंद आहेत. यामुळ मुलंही घरच्या घरी राहून चांगलेच बोर झाले आहेत. सरकारने हळूहळू का होईना नियम शिथिल केले आहेत. यामुळे अनेकांनी बाहेर जाण्याचा ठरवलेले आहेत. यात जंगल सफारीला अधिक पसंती दिली जात आहे.

सहल म्हणजे दूर कुठेतरी कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाणे. एका निवांत ठिकाणा चांगला वेळ घालवण्यात जी मजा आहे ती कुठेही नाही. विदर्भात जंगल सफारीसाठी अनेक ठिकाण आहेत. विदर्भात तब्बल आठ वनपर्यटनस्थळ आहेत. इथे अनेक प्रकारचे प्राणी, पशुपक्षांचा संचार असतो. वनविभागाच्या वतीने पर्यटकांसाठी विचिध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतात.

मात्र, जंगल सफारीला गेल्यावर निसर्गाला आणि वन्यप्राण्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये किंवा स्वतःला इजा होऊ नये याची जबाबदारी पर्यटकांनाच ध्यावी लागते. अनेकांना वनविभागाने सांगितलेल्या नियमांची आठवण राहत नाही. असे म्हणता येईल का पर्यटनाच्या आनंदात ते विसरून जातात. मात्र, आज आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत जे तुम्हाला कायम फायदा देईल...

काही कामाची माहिती

  • जंगल सफारीला जाताना सर्वांत महत्त्वाची गोष्टा म्हणजे हिंस्त्र प्राण्यांपासून दूर राहा. ते पाळीव नाहीत याचे भान असू द्या. तुमच्यावर ते हल्ला करू शकतात. त्यामुळे त्यांना त्रास देऊ नका.

  • जंगल सफारी करताना मला सर्वा माहिती आहे, असे समजून कुठेही एकटं जाण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्याने तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. जंगल सफारी करताना गाईड सोबत घ्यायला विसरू नका.

  • जंगल सफारीत तुम्हाला अनेक नवीन प्राणी बघायला मिळू शकतात. तुम्ही कोणते प्राणी बघितले हे दुसऱ्यांना सांगण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी कॅमेरा घेऊन जायला विसरू नका.

  • कुठेही फिरायला गेलो की काहीना काही खाण्याची घेऊन जायची आपल्याला सवय असते. जंगल सफारीला गेल्यानंतर मात्र कुठल्याही प्राण्याला स्वतःजवळील पदार्थ खायला देऊ नका. माकडे खाण्यासाठी तुमच्यावर हल्ला सुद्धा करू शकतो.

  • जंगल सफारीला जाताना पूर्ण बाह्यांचे आणि जाड कपडे परिधान करा. असे केल्याने तुमचे थंडीपासून आणि कीटकांपासून संरक्षण होईल.

  • जंगलात मोबाईलचा वापर टाळा, धूम्रपान करू नका.

  • प्राणी दिसल्यास कोणत्याही प्रकारचा आवाज होऊ देऊ नका. तुम्ही केलेल्या आवाजाने वन्यप्राणी पळून जाईल.

हे काही नियम ठेवा लक्षात

  • जंगल सफारीसाठी तुम्ही खाजगी वाहनांचा वापर करू शकत नाही. तुम्हाला आधी परवानगी घ्यावी लागते.

  • जगंल सफारीत तुम्ही कोणताही ज्वलनशील पदार्थ घेऊन जाऊ शकत नाही.

  • जंगल सफारीचे बुकिंग सिझनमध्ये सहज मिळत नाही. त्यामुळे आधीच प्री बुकिंग करून ठेवा.

  • जंगलात अतिथीगृहाची व्यवस्था असते, मात्र त्याची बुकिग तुम्हाला आधीच करावे लागते.

  • बरेचसे नॅशनल पार्क सप्टेंबर महिन्यात बंद होतात. त्यामुळे ऑक्टोबर ते एप्रिल या काळात तुमची पिकनिक प्लॅन करा.

(Remember-the-rules-and-information-before-to-go-for-tourism)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT