टूरिझम

चला चांदणीबर्डीला; पवित्र धार्मिक स्थळांमध्ये होते गणना

मनोज खुटाटे

जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्यातील पवित्र धार्मिक स्थळांमध्ये चांदणीबर्डीची गणना होते. येथे जेव्हा संत भाकरे महाराजांची झोपडी होती तेव्हा मोठ्या प्रमाणावर गर्दी दररोज असायची व ग्रामीण नागरिकांना रोजगार मिळत होता. संत भाकरे महाराज यांचे पूर्ण नाव मारोती चिधुजी भास्कव्हरे (रा. पारडी, वाडी, ता. कारंजा, जिल्हा वर्धा) होते.

संत भाकरे महाराज १६ व्या वर्षी घर सोडून पंढरपूर गेले व तिथे कैकाडी बाबा यांना गुरू केले. तेथून १९४८ साली महेंद्री येथे आले व तीन वर्ष कैकाडी बाबांचे, गाडगे बाबांचे, तुकडोजी महाराज यांचे कीर्तन केले. नंतर चांदणीबर्डीमध्ये १९५१ साली आले व तिथे छोटीशी झोपडी बांधली. हळूहळू त्यांचा मोठा भक्त वर्ग तयार झाला. अत्यंत राधी राहणी व उच्च विचार असलेल्या संत भाकरे महाराजांचे अनेक अनुयायी झाले.

महाराजांच्या निधनानंतर हे एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून पुढे आले. आता वर्षातून येथे चार मोठे कार्यक्रम होत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र मध्ये आंधळे, लगडे, लुल्ले यांची दिवाळी. काटोल, वरुड, कारंजा, नरखेड मधील सर्वांत मोठा महाशिवरात्री सप्ताह होत असते. दत्त जयंती व बाबाची पुण्यतिथी होत असते. संत भाकरे महाराज यांचा जन्म २० फेब्रुवारी १९२१ ला झाला तर मृत्यू ३१ जुलै १९९९ ला दाभा येथे झाला. त्यांना एक ऑगस्ट १९९९ ला चांदणीबर्डी येथे समाधी देण्यात आली.

भक्तांसाठी भक्त निवासाची व्यवस्था

श्री संत भाकरे महाराज सेवा आश्रम चांदणीबर्डी (ता. नरखेड, जि. नागपूर) येथे विविध मंदिरे, मोठे समाज भवन, नदी, बंधारा व सभोवती निसर्गरम्य वातावरण आहे. मुलांसाठी बाल उद्यान देखील आहे. येथे वर्षभरात भेट देता येऊ शकते. चांदणीबर्डी येथे जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय केली आहे. मात्र, रात्री ८ नंतर सार्वजनिक वाहतुकीची सोय नाही. मंदिरात भक्तांसाठी भक्त निवासाची व्यवस्था आहे.

पर्यटनस्थळाशी निगडीत विशिष्ट दिवस

महाशिवरात्री, आषाढ वैध पंचमी जुलै, कार्तिक वैध प्रतिपदा दिवाळी आंधळे, लगडे यांची, महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव, वर्षातले विशिष्ट दिवस जेव्हा इथे वेगळे काही पाहायला मिळते. महाशिवरात्री व आषाढी एकादशीला राज्यातील विविध भागातून दिंड्या येतात.

आवर्जून भेट द्यावी अशी ठिकाणे

नारायणपूर, हनुमान मंदिर, चिंतामुनीश्वर टेकडी (पुरातन जोतिर्लिंग), ७५ फूट उंच शिव मूर्ती, सोमेश्वर किल्ला, मन्नाथेश्वर देवस्थान, सती अनुसया माता मंदिर पारडसिंगा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT