Shravan 2024 esakal
टूरिझम

Shravan 2024 : महाराष्ट्रातील महादेवांची सुप्रसिद्ध मंदिरे, यंदाच्या श्रावणात नक्की द्या भेट, मनोकामना होतील पूर्ण.!

Shravan 2024 : भगवान शंकरांना प्रिय असलेला हा श्रावण महिना अनेक दृष्टींनी महत्वाचा आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Shravan 2024 : हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. भगवान शंकरांना प्रिय असलेला हा श्रावण महिना अनेक दृष्टींनी महत्वाचा आहे. या महिन्यात अनेक महत्वाचे सण साजरे केले जातात. याच महिन्यात महादेवांची आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते. श्रावण हा महिना भगवान शंकरांना समर्पित आहे.

महाराष्ट्रात दक्षिण पंचांगानुसार ५ ऑगस्टला (सोमवारी) श्रावण सुरू होणार आहे. श्रावणात अनेक भाविक महादेवांच्या मंदिरांना भेट देताता. संपूर्ण देशात महादेवांची अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी, महाराष्ट्रात देखील काही प्राचीन मंदिरे आहेत.

जर यंदाच्या श्रावणात तुम्ही महादेवांच्या मंदिरांना भेट देण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशाच काही मंदिरांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या मंदिरांबद्दल.

भिमाशंकर ज्योतिर्लिंग

देशभरात भगवान शंकरांची १२ ज्योतिर्लिंगे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ५ ज्योतिर्लिंग आहेत. या ५ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भिमाशंकरचे मंदिर होय. हे भिमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरूनगर) तालुक्यात आहे.

भिमाशंकर ज्योतिर्लिंग

हे भव्य मंदिर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये स्थित असून, हे एक जागृत देवस्थान आहे. या मंदिराजवळून भीमा नदी वाहते. त्यामुळे, या मंदिराला भिमाशंकर असे नाव देण्यात आले. श्रावणात या मंदिराला अवश्य भेट द्या.

त्र्यंबकेश्वर मंदिर

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकमध्ये स्थित आहे. या ठिकाणावरूनच या मंदिराला त्र्यंबकेश्वर असे नाव देण्यात आले.

त्र्यंबकेश्वर मंदिर

या ठिकाणी वर्षभर भक्तांची गर्दी पहायला मिळते. श्रावणात तुम्ही या त्र्यंबकेश्वर मंदिराला नक्कीच भेट देऊ शकता.

औंढा नागनाथ मंदिर

भगवान शंकरांच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथमध्ये स्थित आहे.

औंढा नागनाथ मंदिर

हे एक प्राचीन मंदिर असून ते औंढा नागनाथ मंदिर या नावानेच ओळखले जाते. हे प्राचीन मंदिर ७२०० स्क्वेअर फूट परिसरात पसरले असून, या मंदिरातील नक्षीकाम अप्रतिम आहे. श्रावणात या मंदिराला अवश्य भेट द्या.

घृष्णेश्वर मंदिर

यंदाच्या श्रावणात महाराष्ट्रातील या ज्योतिर्लिंगाला अवश्य भेट द्या. घृष्णेश्वराचे हे प्राचीन शिवमंदिर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात स्थित आहे.

घृष्णेश्वर मंदिर

वेरूळपासून अवघ्या दीड किलोमीटरवर असलेले हे घृष्णेश्वर मंदिर भारतातील प्राचीन आणि महत्वाचे धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे शिवपुराण, स्कंदपुराण आणि महाभारत या ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे. श्रावणात या मंदिराला नक्की भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

Horoscope Marathi : कुणाला होणार धनलाभ तर कुणाला मोठा तोटा! कसा असेल तुमचा उद्याचा दिवस? पाहा मेष ते मीन सर्व राशींचे राशीभविष्य

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये कुष्ठरोगाविरुद्ध मोठी मोहीम सुरू; ३५ लाखांहून अधिक लोकांची घरोगरी तपासणी, प्रशासनाचा सर्वांना सहकार्याचा आग्रह

IND vs SA : 'तुमचा बँक बॅलन्स वाढवत राहा...' कोलकाता कसोटीनंतर पीटरसन संतापला; खेळाडूंसह क्रिकेट बोर्डालाही झापलं

SCROLL FOR NEXT