श्रावण विशेष : मंगळवेढ्यातील काशीविश्वेश्वर मंदिराकडे भाविकांचा ओढा Canva
टूरिझम

श्रावण विशेष : मंगळवेढ्यातील काशीविश्वेश्वर मंदिराकडे भाविकांचा ओढा

श्रावण विशेष : मंगळवेढ्यातील काशीविश्वेश्वर मंदिराकडे भाविकांचा ओढा

हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा शहरात श्रावण महिन्यामध्ये काशीविश्वेश्वर मंदिर व महादेव मंदिर (पंढरपूर रोड) या ठिकाणी दर्शनाच्या निमित्ताने भाविकांची गर्दी होते.

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा (Mangalwedha) शहरात श्रावण महिन्यामध्ये काशीविश्वेश्वर मंदिर (Kashivishveshwar Temple) व महादेव मंदिर (Mahadev Temple) (पंढरपूर रोड) या ठिकाणी दर्शनाच्या निमित्ताने भाविकांची गर्दी होते. येथील देवतांकडे भविष्यातील इच्छापूर्तीसाठी नवस केले जातात. या धार्मिक स्थळांकडे पर्यटकांचा (tourists) ओढा अलीकडच्या काळामध्ये आणखीच वाढला आहे. रत्नागिरी (Ratnagiri) - नागपूर (Nagpur) या महामार्गामुळे मंगळवेढ्याचे नाव महामार्गाच्या नकाशावर आले. त्यामुळे येथे दळणवळणाची साधने आता सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. मंगळवेढा शहरातील किल्ला भागात काशीविश्वेश्वराचे मंदिर आणि विहीर पाहण्यासारखी आहेत. मंदिर परिसरातील शिलालेखात 1572 साली मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आढळतो.

प्राचीनकाळी पुलकेशी चालुक्‍याच्या मंगलेश या दुसऱ्या मुलाचा या ठिकाणी तळ होता. त्याच्या नावावरून गावास मंगळवेढा नाव पडले असावे, असे जाणकारांचे मत आहे. आठव्या शतकात काशीविश्वेश्वराच्या मंदिराची निर्मिती चालुक्‍यांनी केली. त्यानंतर आलेल्या कलचुरींची राजधानी काही काळ या ठिकाणी होती. ते स्वत:ला ब्रह्माचे वंशज (पूजक) मानत असल्याने त्यांनी या ठिकाणी ब्रह्मदेवाचे देऊळ बांधले असावे. आज देऊळ अस्तित्वात नसले तरी ब्रह्मदेवाची मूर्ती आजही आपल्याला पाहायला मिळते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जगातील हे ब्रह्मदेवाचे मंदिर असणारे दुसरे ठिकाण आहे, असे मानले जात आहे. राजस्थानातील पुष्करनंतर या ठिकाणी एकमेव असे ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. येथे श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते. संत चोखोबांचा गावकुश अंगावर पडून मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अस्थी संत नामदेव महाराज पंढरपूरला घेऊन जात असताना शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महादेव मंदिरासमोर त्यांनी विसावा घेतला आणि तेच ठिकाण महादेव मंदिराबरोबर विसाव्याचे ठिकाण म्हणून इतिहासात अधिक परिचित झाले. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची श्रावणात गर्दी मोठी असते. शहर व ग्रामीण भागात असलेल्या धार्मिक स्थळांच्या माध्यमातून भाविकांच्या भेटीगाठी दर्शनाच्या निमित्ताने होत असेल तर या धार्मिक स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे आवश्‍यक आहे

मंगळवेढा शहरातील इतर प्रेक्षणीय ठिकाणे

संत दामाजी मंदिर, संत चोखामेळा समाधी, कान्होपात्रा मंदिर, गणपती मंदिर, भुईकोट किल्ला, कृष्ण तलाव, गैबीसाहेब दर्गा, गोपणबाई विहीर आदी.

खाद्यपदार्थ...

खवय्यांसाठी मंगळवेढ्यातील प्रसिद्ध ठिकाणे : सुगरण, अन्नपूर्णा, राजधानी, रानवारा, स्वाद हे चविष्ट जेवणासाठी तर मस्तानी (आत्माशांत), बासुंदी (सोमनाथ माळी), भेळ (सुनील सोमदळे), रगडा (पिंटू वाकारकर) हे चवदार पदार्थ येथे मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Aaghadi: इंडिया आघाडीचं ठरलं! भाजपविरोधात 'हा' प्लॅन रेडी; उद्धव ठाकरेंचा मात्र वेगळाच सूर, भर बैठकीत सुनावलं...

Donald Trump: ''तात्काळ हल्ले थांबवा, नाहीतर...'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराण-इस्रायलला इशारा; पुढच्या दोन दिवसात सगळं थांबणार?

Ujjwala Scheme: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा झटका! केंद्र सरकारने सबसिडीच्या सिलिंडरची संख्या घटवली; आता किती मिळणार?

Rave Party Case : रेव्ह पार्टी प्रकरण! तुळापुरातील फार्महाऊस सील; शिवराज्याभिषेक दिनीच पार्टी झाल्याने ग्रामस्थांचा संताप

IND A Tri-Series: वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, भारतीय अ संघ श्रीलंकेत खेळणार वनडे तिरंगी मालिका! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहाणार सामने?

SCROLL FOR NEXT