टूरिझम

टेकडी गणेश मंदिर : राजे भोसले यांनी केले बांधकाम!

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : टेकडी गणपती मंदिर हे नागपूर रेल्वे स्थानकाजवळ असलेले प्राचीन गणपती मंदिर आहे. हे नागपुरातील लोकप्रिय मंदिर आहे. हे मंदिर टेकडीवर असल्याने टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते. नागपूरचे राजे भोसले यांनी सुमारे १८ व्या शतकात हे मंदिर बांधल्याचे समजते. भोसले राजे आणि ब्रिटिशांची लढाई ज्या ठिकाणी झाली, त्याच ठिकाणी हे गणपतीचे मंदिर आहे.

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असले, तरी मूर्ती उत्तराभिमुख आहे. गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागील भिंतीला लागून शिवलिंग आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाच्या ठिकाणी नंदी बसवलेला दिसतो. दुसऱ्या भागात आणखी एक गणपती मंदिर आहे. तो फौजी गणपती म्हणून ओळखला जातो. शुक्रवार तलावाचे पाणी पूर्वी सीताबर्डी किल्ल्यापर्यंत होते. भोसले राजे नावेतून तेथे गणेश दर्शनासाठी येत होते असे सांगितले जाते.

पूर्वी गणेशाची मूर्ती भोकरीच्या झाडाखाली उघड्यावर होती. या ठिकाणी पूर्वी मोठे मंदिर होते; नंतर ते उद्ध्वस्त झाले. त्याचे अवशेष आजही दिसतात. मंदिराच्या आसपास वड-पिंपळाची झाडे आहेत. ही मूर्ती उजव्या सोंडेची असून दोन पाय, चार हात, डोके, सोंड पूर्वी स्पष्ट दिसत असे. आता शेंदराच्या पुटांमुळे मूर्ती स्पष्ट दिसत नाही. मूर्तीची उंची साडेचार फूट व रुंदी तीन फूट आहे. मूर्तीच्या मागे पिंपळाचे झाड आहे. त्याच्या मुळांमुळे मूर्ती मूळ जागेहून थोडी पुढे सरकली असावी, असा तर्क आहे. तिळी चतुर्थीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते.

मंदिराचे निर्माण गुलाबी रंगाच्या पाषाणापासून

येथील मंदिराला पूर्णतः नवीन लूक मिळत आहे. मंदिराला भव्य स्वरूपात साकारण्यात येत आहे. मंदिराचे निर्माण गुलाबी रंगाच्या पाषाणापासून करण्याचा मंदिर प्रशासनाचा मानस आहे. मंदिराचे नवीन रूप गुलाबी रंगात रंगलेले दिसून येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT