these are the best places to visit in Karnataka Marathi article  
टूरिझम

निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जायचंय? मग कर्नाटकातील या ठिकाणांना नक्की भेट द्या

सकाळ डिजिटल टीम

उन्हाचा पारा चढताच अनेक लोकांना वेध लागतात ते एखाद्या सुंदर अशा नैसर्गिक ठिकाणी फिरायला जाण्याचे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांध्ये बरेच जण पर्यटनाचे प्लॅन आखतात. पण कोरोना महामारीच्या काळात प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हालासुद्धा निसर्गाच्या जवळ राहून प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर कर्नाटक हे एक उत्तम ठिकाण ठरु शकते. येथे आपण उंच डोंगर, मैदाने आणि धबधब्यांचा आनंद घेऊ शकता. आज आपण कर्नाटकातील अशाच काही भन्नाट ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत.

दांडेली

दांडेली हे कर्नाटकच्या पश्चिम घाटात आहे. हे शहर काली नदीच्या काठावर वसलेले असून येथे पर्यटक वॉटर राफ्टिंग आणि कॉयकिंगचा आनंद लुटतात. तुम्हाला येथे नदीकाठावरील दुर्मिळ पक्षीसुद्धा येतील. पक्षीनिरीक्षणाचा जर छंद असेल तर तुम्हाला हे ठिकाण नक्की आवडेल. दांडेलीच्या किनार वाइल्ड लाइफ सेंचुरीत आपण सफारीचा आनंद देखील घेऊ शकता. याशिवाय दांडेलीपासून 22 किलोमीटर अंतरावर सुपा धरण आहे. याव्यतिरिक्त, शहरात दानादेप्पा मंदिर आहे. जेव्हा आपण कर्नाटकात जाता तेव्हा दांडेलीला आवश्य भेट द्या.

गोकर्ण

गोकर्ण हे एक धार्मिक स्थळ आहे. येथे आपण ओम बीच, अर्ध-चंद्र आणि पॅरासाईट बीचवर प्रवासाचा आनंद घेऊ शकता. गोकर्णमध्येच महाबळेश्वर मंदिर आहे. आपण गोकर्ण येथे सायकल चालविणे, ट्रेकिंग आणि माउंटन क्लाइंबिंगचा आनंद घेऊ शकता. पर्यटक गोकर्ण बीचवर सर्फिंगचा देखील आनंग घेतात.  उन्हाळ्याच्या दिवसात समुद्रकाठ वातावरण खूप आनंददायक असते. यासाठी उन्हाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक गोकर्ण येथे येतात.

हम्पी

हंम्पीचा इतिहास सुवर्णअक्षरांनी लिहिलेला आहे, कर्नाटकच्या उत्तरेस  तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले हे शहर त्याच्या सांस्कृतीक वारशासाठी जगभरात प्रसिध्द आहे.  इतिहासकार सांगतात की, हे शहर विजयनगरची राजधानी देखील होते. धार्मिक श्रद्धा आहे की या शहरातच भगवान राम हे हनुमान आणि वानरांचा राजा सुग्रीव यांना भेटले होते. तसेच या शहरात बरीच ऐतिहासिक मंदिरे आहेत, जिथे तुम्हाला तुमच्या देवतांचे दर्शन घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

तेजश्री प्रधानला रिप्लेस करणारी अभिनेत्री होणार आई; समुद्रकिनारी फोटोशूट करत दाखवला बेबी बंप, तुम्ही ओळखलंत का?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

SCROLL FOR NEXT