these are perfect destination for weekend holidays Marathi story.jpg 
टूरिझम

फिरायला जायचंय? ही शहरं आहेत परफेक्ट डेस्टिनेशन्स, एकदा आवश्य भेट द्या

सकाळ डिजिटल टीम

कोरोना व्हायरसमुळे अख्खे जग बदलून गेले आहे. लाखो लोकांचे जीव घेणाऱ्या महामारीमुळे संपूर्ण जगाला घरात अडकून पडावे लागले. पण आता हळूहळू परिस्थीती सामान्य होत असून  लोक फिरायला देखील जात आहेत. लॉकडाऊनच्या या काळात  घरात बसून कंटाळलेली मंडळी अनलॉक होताच कुठेतरी फिरायला जाण्याचे प्लॅन करताना दिसत आहेत. मात्र कोरोना पुर्णतः संपलेला नसून त्याबद्दलची भीती लोकांच्या मनातून अद्यापही पुर्णपणे गेलेली नाही. त्यामुळे फिरायला जाण्यासाठी अजूनही लोक कोरोनाचा धोका जिथे कमी प्रमाणात आहे असे ठिकाण शोधताना दिसतात. तुम्हीदेखील विकेंडसाठी निवांत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आपण अशाच तीन निवांत आणि सहज जाणे शक्य असेल अशा पर्यटनस्थळांबद्दल जाणून घेणार आहोत.

भुंतर, हिमाचल प्रदेश

हिमाचाल प्रदेश हे राज्य पर्यटकांना कायम आकर्षीत करत आलेले आहे. येथे  जगभरात प्रसिध्द असलेली, आफाट सुंदतेने नटलेली असंख्य पर्यटनस्थळं आहेत ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता. त्यापैकीच भुंतर हे एक आहे. कुल्लू जिल्ह्यात वसलेलं हे ठिकाण व्यास आणि पार्वती नदीच्या किनाऱ्यावर आहे. भुंतर या ठिकाणी एअरपोर्ट देखील आहे त्यामुळे विकेंडसाठी तुम्ही येथे आरामात पोहचू शकता. हे ठिकाण मनाली आणि मणिकर्ण यांच्या जवळ असल्याने ती ठिकाणे देखील पाहाता येतील. 

हल्दानी, उत्तराखंड 

देवांची भूमी म्हणून प्रसिध्द असलेल्या उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी देखील असंख्य जागा आहेत. येथे चार धाम सोबतच इतरही अनेक ठिकाणे आहेत ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता. त्यापैकीच हल्दानी हे एक ठिकाण आहे. हल्दानी हे उत्तराखंड राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे, तसेच या शहराला कुमाऊँचे प्रवेशद्वार देखील म्हणतात. हे शहर तुमच्या छोट्याशा ट्रिप साठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरु शकते. 

कोल्लम, केरळ

केरळ हे राज्य त्याच्या सुंदरतेमुळे प्री वेडींग शूट आणि वेडिंग डेस्टिनेशन म्हणून कित्येकांची पहिली पसंती ठरते. केरळमध्ये असलेलं कोल्लम या ठिकाणी कोल्लम बीच, अष्टमुदी तलाव, मैदान, टेकड्या यासारखे असंख्य ठिकाणे तुम्ही पाहू शकता. हे ठिकाण जगभारतील देशांसोबत व्यपारासाठी देखील प्रसिध्द आहे, खासकरुन चीन, अरब राष्ट्रे आणि इटली या देशांसोबत मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो. विकेंडचा पुर्ण आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही कोल्लमला नक्की भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

३०० वर्षानंतर मानवी शरीरात आढळला नवा अवयव, कॅन्सर उपचारात होऊ शकतो बदल

Weather Update : कोल्हापुरात ढगफुटीसदृश पाऊस, अनेक भागात ‘कोसळधार’; आणखी 'किती' दिवस पावसाची शक्यता!

BDCC Bank : बीडीसीसी बँकेसमोर काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी; सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा BJP चा आरोप

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून; मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली घटना

India vs Pakistan Asia Cup 2025 : सरकारच्या आदेशानुसार भारत-पाकिस्तान सामना, नियमांचं पालन करणार; अरुण धुमल यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT