Rajasthan Camping esakal
टूरिझम

Rajasthan Camping : डेझर्ट सफारी व्यतिरिक्त राजस्थानमध्ये करा कॅम्पिंग, 'ही' आहेत बेस्ट ठिकाणे

Rajasthan Travel : देशातील आणि विदेशातील पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण म्हणजे राजस्थान होय. राजस्थान या राज्याची वेगळी अशी ओळख आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Rajasthan Camping : देशातील आणि विदेशातील पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण म्हणजे राजस्थान होय. राजस्थान या राज्याची वेगळी अशी ओळख आहे. येथील इतिहास, हवेली, राजवाडे, किल्ले, खाद्यसंस्कृती आणि वाळवंट इत्यादी अनेक गोष्टी पर्यटकांना भुरळ घालतात. या राज्यात अशी अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळे आहेत, जिथे देश-विदेशातील पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.

राजस्थानातील डेझर्ट सफारी, राजवाडे, हवेली, तलाव आणि इतर ठिकाणे जर तुम्ही पाहिली असतील आणि जर तुम्हाला काहीतरी वेगळे करायचे असेल तर तुम्ही राजस्थानमध्ये कॅम्पिंग करू शकता. राजस्थानच्या वाळवंटात कॅम्पिंग करण्याचा एक भन्नाट अनुभव तुम्ही घेऊ शकता.

या राज्यात अशी काही ठिकाणे कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहेत. जर तुम्हाला कॅम्पिंगची आवड असेल तर, तुम्ही या ठिकाणी जाण्याचा नक्कीच विचार करू शकता. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

उदयपूरमध्ये करा कॅम्पिंग

जर तुम्हाला कॅम्पिंग करताना लॅव्हिश अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही उदयपूर या शहराचा नक्कीच विचार करू शकता. उदयपूरमध्ये सुंदर हवेली, राजवाडे आणि तलाव या व्यतिरिक्त कॅम्पिंग देखील केले जाते.

या कॅम्पिंगच्या ठिकाणी मिळणारी लॅव्हिश सुविधा तुमचा मुक्काम आणखी खास बनवतील. या ठिकाणी तुम्हाला कॅम्पिंगसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील. नाईट कॅम्पिंगसाठी उदयपूर हे बेस्ट ठिकाण आहे, यात काही शंका नाही. या ठिकाणी कॅम्पिंग करताना, तुम्हाला येथे उत्कृष्ट पदार्थ खायला मिळतील.

जैसलमेरमध्ये करा नाईट कॅम्पिंग

जैसलमेरमध्ये फिरण्यासाठी अनेक पर्यटनस्थळे आहेत. ती पाहून झाल्यानंतर ही तुम्ही या ठिकाणी कॅम्पिंग करू शकता. येथील नाईट कॅम्पिंग विशेष लोकप्रिय आहे. जर तुम्हाला रात्रभर वाळवंटात रहायचे असेल तर, तुम्ही येथील नाईट कॅम्पिंगचा विचार करायला काही हरकत नाही.

येथे तुम्ही थारच्या वाळवंटात देखील जाऊ शकता. कॅम्पिंग करताना येथील पारंपारिक राजस्थानी लोकनृत्यांचा आणि भोजनाचा आस्वाद ही तुम्हाला घेता येईल. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील खास आयोजन या ठिकाणी केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कर्नाटक-तामिळनाडूमधील कावेरी वादावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

Alien Star Reels Viral: इंस्टावर व्हायरल झालेला ‘एलियन स्टार’ कोण? आधी लोकांनी उडवली थट्टा, आता प्रत्येक व्हिडिओला मिलियन व्ह्यूज

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

SCROLL FOR NEXT