Christmas 2023 esakal
टूरिझम

Christmas 2023 : ख्रिसमसच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग, ‘या’ हिलस्टेशन्सला नक्की भेट द्या

ख्रिसमसनिमित्त अनेक जण फॅमिलीसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.

Monika Lonkar –Kumbhar

Christmas 2023 : डिसेंबर महिना सुरू होऊन आता १५ दिवस उलटून गेले आहेत. याच महिन्यात २५ तारखेला ख्रिसमस देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जगभरातील अनेक देशांमध्ये ख्रिसमसची नुसतीच धामधूम पहायला मिळते.

ख्रिसमसच्या निमित्ताने लोक घरांची सजावट करतात. ख्रिसमसची खास शॉपिंग करतात. घरोघरी विविध प्रकारचे केक बनवले जातात आणि लोक चर्चमध्ये जाऊन येशूची प्रार्थना करतात. ख्रिसमसचा हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.

ख्रिसमसनिमित्त लॉंग विकेंड देखील असतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये लोक आपल्या फॅमिलीसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. या वर्षी ख्रिसमसनिमित्त तुम्ही देखील फिरायला जाण्याचा प्लॅन करणार असाल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

नैनिताल

उत्तराखंड राज्यातील नैनिताल हे सुप्रसिद्ध हिल स्टेशन आहे. या प्रसिद्ध ठिकाणी पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. नैनिताल हे ठिकाण उंच पर्वातांमध्ये वसले असून, येथील निसर्गाचा नजारा पाहण्यासारखा असतो.

Nainital

खास करून हिवाळ्यात येथे बर्फवृष्टी देखील होते. त्यामुळे, बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी देखील पर्यटकांची येथे गर्दी असते.

नैनिताल येथील नैनी झील, नैना देवी मंदिर, सरिता तलाव, हनुमान गढी आणि अन्य पर्यटन स्थळांवर तुम्ही भेट देऊ शकता.

मसूरी

उत्तराखंड राज्यातील आणखी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे मसूरी होय. या हिलस्टेशनला भेट देण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक गर्दी करतात. या सुंदर परिसरात अनेक चित्रपटांचे-मालिकांचे आतापर्यंत शूटिंग झाले आहे. या परिसरात नेहमीच शूटिंग होत असतात.

Mussorie

मसूरीमध्ये तुम्ही मॅगी पॉईंट, मसूरी लेक, मॉल रोड, केम्पटी फॉल्स आणि अन्य ठिकाणे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. हिवाळ्यात येथे ही बर्फवृष्टी होते. येथील साहसी खेळांचा ही तुम्ही आनंद घेऊ शकता.

मनाली

मनाली हे ठिकाण आता सर्वांनाच माहित आहे. हिमाचल प्रदेशातील सुप्रसिद्ध ठिकाण म्हणून मनालीची खास ओळख आहे. मनालीमध्ये तुम्ही अनेक बर्फातील साहसी खेळांचा आणि बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता.

Manali

मनालीमध्ये तुम्ही मॉल रोड, हिडिंम्बा मंदिर, मनुमंदिर, सोलंग व्हॅली इत्यादी अनेक पर्टयन स्थळांना भेट देऊ शकता. येथील नयनरम्य परिसर पर्यटकांचे खास लक्ष वेधून घेतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT