South India Travel esakal
टूरिझम

South India Travel : स्वर्गाहून सुंदर आहेत दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणे, मार्चमध्ये करा फिरायला जाण्याचा प्लॅन

South India Travel : दक्षिण भारत हा देशातील असाच एक भाग आहे, जो नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. या दक्षिण भारताचे सौंदर्य जगभरात प्रसिद्ध आहे.

Monika Lonkar –Kumbhar

South India Travel : भारत हा विविवधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे, भारतातील अनेक भागांमध्ये विविध प्रकारच्या परंपरा, खाद्यसंस्कृती आणि निसर्गसंपन्नतेमध्ये वेगळेपणा दिसून येतो. दक्षिण भारत हा देशातील असाच एक भाग आहे, जो नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. या दक्षिण भारताचे सौंदर्य जगभरात प्रसिद्ध आहे.

त्यामुळे, दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक या दक्षिण भारताला भेट देतात. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये अनेक सुंदर आणि अद्भुत ठिकाणे आहेत. ही ठिकाणे स्वर्गाहून काही कमी नाही. चला तर मग जाणून घेऊयात, या दक्षिण भारतातील सुंदर ठिकाणांबद्दल.

विशाखापट्टणम

आंध्र प्रदेश या राज्यातील सर्वात मोठे शहर म्हणून विशाखापट्टणमला ओळखले जाते. या शहराचे सौंदर्य तुमच्या मनाला भुरळ घालेल, यात काही शंका नाही. हे शहर ‘वायझॅग’ या नावाने ही ओळखले जाते. या शहराला पूर्वचे गोवा असे ही म्हटले जाते.

या शहरातील सुंदर समुद्रकिनारे, प्रसिद्ध उद्याने, नारळाची झाडे आणि मनमोहक पर्वत तुमचे लक्ष वेधून घेतात. या ठिकाणी विविध पर्टनस्थळे आहेत, जी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. या पर्यटनस्थळांमध्ये कैलाशगिरी, बोरा गुहा, काटिकी धबधबा, यार्डा बीच, वुडा पार्क आणि डॉल्फिन नोज यांच ही समावेश आहे. विशाखापट्टणमला गेल्यावर या ठिकाणांना भेट द्यायला अजिबात विसरू नका. (vishakhapatnam)

कोडाईकनाल

तामिळनाडू राज्यात फिरायला जायचे म्हटल्यावर अनेक जण उटी, कन्याकुमारी, चेन्नई आणि रामेश्वरम इत्यादी ठिकाणांना पसंती देतात. मात्र, ही ठिकाणे सोडून तामिळनाडूमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्याचे सौंदर्य अप्रतिम आहे. यामध्ये कोडाईकनाल या पर्यटनस्थळाचा ही समावेश आहे. मार्चमध्ये फिरायला जाण्यासाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे.

हे एक सुंदर हिलस्टेशन असून, अनेक कपल्सचे लोकप्रिय हनिमून डेस्टिनेशन आहे. मार्चमध्ये येथील वातावरण अप्रतिम असते. धुक्याने झाकलेले पर्वत, खोल दऱ्या आणि सुंदर तलाव कोडाईकनालच्या सौंदर्यात भर घालतात. कोडाईकनालमध्ये गेल्यावर कोडाईकनाल तलाव, कोकर वॉक, सिल्वर कॅस्केड फॉल्स, ग्रीन व्हॅली व्ह्यू पॉईंट इत्यादी ठिकाणांना अवश्य भेट द्या. (kodaikanal)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या आंदोलनाची वेळ संपली, कोर्टाचा आदेश घेऊन पोलिस आंदोलनस्थळी दाखल

Mumbai Metro: आता गर्दीला रामराम! मेट्रो प्रवाशांसाठी भूमिगत वॉकवेची भन्नाट योजना, नवीन आठ प्रस्तावांना मंजुरी

Family Pension Rules: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून कुटुंब पेन्शनसाठी नवीन नियम जारी, आता मुलांना वडिलांची पेन्शन कधी मिळणार? वाचा...

'सर... माझं ब्रेकअप झालय' Gen Z कर्मचाऱ्याने बॉसला पाठवला मेल, बॉसला दया आली आणि १० दिवसांची सुट्टी मंजूर झाली

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी शरद पवार पक्ष रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व ५९ जागांवर निवडणूक लढवणार

SCROLL FOR NEXT