Dwarka Travel esakal
टूरिझम

Dwarka Travel : द्वारकेच्या आजूबाजूला असलेल्या 'या' समुद्रकिनाऱ्यांसमोर गोवा देखील पडेल फिका, एकदा नक्की द्या भेट

Dwarka Travel : गुजरात या राज्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि प्रमुख शहर म्हणून द्वारका या शहराची खास ओळख आहे. हे शहर भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Dwarka Travel : गुजरात या राज्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि प्रमुख शहर म्हणून द्वारका या शहराची खास ओळख आहे. हे शहर भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित आहे. भारतातील प्रमुख चारधामपैकी द्वारका हे एक प्रमुख धाम मानले जाते.

अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर तेथील पवित्र मंदिरे, समुद्रकिनारे आणि मनमोहक पर्यटनस्थळांसाठी लोकप्रिय आहे. द्वारका आणि तेथील आसपासचे समुद्रकिनारे या शहराच्या सौंदर्यात आणखी भर घालतात.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच द्वारकेला (Dwarka Travel) भेट दिली होती. यावेळी मोदी द्वारकेजवळ स्थित असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर स्कूबा डायव्हिंग करताना दिसले होते. या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर, द्वारका हे शहर चांगलेच चर्चेत आले होते.

जर तुम्ही देखील द्वारकेला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला द्वारका या शहराच्या आसपास स्थित असलेल्या काही सुंदर समुद्रकिनाऱ्यांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा ही आनंद घेऊ शकता.

द्वारका बीच

द्वारका या शहरापासून जवळपास ३० किलोमीटरच्या अंतरावर स्थित असलेला हा सुंदर समुद्रकिनारा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. द्वारका या शहाराच्या नावावरूनच या समुद्रकिनाऱ्याला हे नाव देण्यात आले.

द्वारकेच्या समुद्रकिनाऱ्यावरून अरबी समुद्राच्या सुंदर लाटा पाहून तुम्हाला समुद्रात डुबकी मारण्याचा मोह आवरणार नाही. या बीचचे निळेशार पाणी आणि पांढरी रेती या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य वाढवते, यात काही शंका नाही. या समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा ही आनंद घेऊ शकता. (Dwarka beach)

मांडवी कच्छ बीच

द्वारका या शहराजवळ स्थित असलेले हे मांडवी कच्छ बीच या परिसरातील सर्वात लोकप्रिय बीच आहे. असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. मांडवी कच्छ समुद्रकिनाऱ्याला ऐतिहासिक महत्व आहे. कारण, मध्ययुगीन काळामध्ये एक शिपिंग पोर्ट म्हणून या समुद्रकिनाऱ्याला ओळखले जात होते.

हा समुद्रकिनारा इतका मनमोहक आहे की, या ठिकाणी ‘लगान’ आणि ‘हम दिल दे चुके सनम’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग करण्यात आले आहे. या समुद्रकिनाऱ्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. या ठिकाणी अनेक स्थलांतरित पक्षी देखील नजरेस पडतात. (Mandvi kutch beach)

शिवराजपूर बीच

द्वारकेला गेल्यावर या बीचला भेट द्यायला अजिबात विसरू नका. द्वारका या शहरापासून ११ किमी अंतरावर असलेल्या शिवराजपूर या समुद्रकिनाऱ्याला त्याच्या सौंदर्यासाठी आणि तेथील स्वच्छतेसाठी ‘ब्लू फ्लॅग बीच’ असा दर्जा मिळाला आहे. हा समुद्रकिनारा तेथील वॉटरस्पोर्ट्ससाठी देखील प्रसिद्ध आहे. या समुद्रकिनाऱ्याला देश-विदेशातील अनेक पर्यटक भेट देतात. (Shivrajpur Beach)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT