Best Places to Visit esakal
टूरिझम

Best Places to Visit : नाताळच्या सुट्टीत फिरायचा प्लॅन करताय? मग, मेघालयातील 'या' ठिकाणांची करा निवड

मेघालय या राज्यात तुम्हाला अनेक निसर्गसंपन्न ठिकाणांना भेट देता येईल.

Monika Lonkar –Kumbhar

Best Places to Visit : आपण सर्व जण आता २०२३ च्या अखेरच्या टप्प्यात आहोत. लवकरच आपण २०२४ मध्ये पदार्पण करणार आहोत. डिसेंबर महिन्यात अनेक जण सुट्टीला जाण्याचा प्लॅन करतात. नाताळचे सेलिब्रेशन आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण या महिन्यात फिरायला जातात.

जर तुम्ही देखील फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हे आर्टिकल खास तुमच्यासाठी आहे. कारण, आज आम्ही मेघालय राज्यातील काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. या राज्यात तुम्हाला अनेक निसर्गसंपन्न ठिकाणांना भेट देता येईल. कोणती आहेत ती ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

शिलाँग

मेघालय या राज्याची राजधानी म्हणून शिलाँगला मान मिळाला आहे. भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक असलेले ठिकाण म्हणजे शिलाँग होय. या ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटक वर्षभर गर्दी करत असतात. जगभरातील पर्यटकांसोबत या ठिकाणी देशातील कानाकोपऱ्यातून येणारे पर्यटक देखील भेट देत असतात.

शिलाँगमधील मोठे तलाव पर्यटकांना आकर्षित करतात. त्यासोबतच, येथील सुप्रसिद्ध एलिफंट फॉल्स सर्वात लोकप्रिय आहे. हा धबधबा अगदी हत्तीच्या आकारासारखा दिसतो. त्यामुळे, पर्यटक येथे नेहमी गर्दी करतात. या हिल स्टेशनवर डोंगराच्या माथ्यावरून पडणाऱ्या पाण्याचे विहंगमय दृश्य मनाला अतिशय भावते.

डॉकी

डॉकी हे नाव आता एव्हाना जगप्रसिद्ध झाले आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. शिलाँगच्या राजधानीपासून ९५ किलोमीटरवर डॉकी हे ठिकाण आहे. हे ठिकाण चार ही बाजूंनी गर्द हिरव्या झाडांनी वेढलेले असून या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे आहेत.

मात्र, या ठिकाणची सर्वात प्रसिद्ध असलेली नदी म्हणजे उमंगोट नदी होय. ही नदी या ठिकाणचे खास वैशिष्ट्य आहे. भारतातील सर्वात स्वच्छ नद्यांपैकी असलेली ही एक नदी आहे. या नदीचे पाणी एवढे स्वच्छ आहे की, या नदीत बोटिंग करण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठी गर्दी करतात.

चेरापुंजी

मेघालय राज्यातील एक लहान शहर म्हणून या शहराची ओळख आहे. मात्र, ही ओळख एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. भारतातील सर्वात जास्त पाऊस या चेरापुंजीमध्ये पडतो. वर्षभर पडणाऱ्या पावसामुळे चेरापुंजी हे शहर जगभरात प्रसिद्ध आहे.

येथील उंच उंच धबधबे, सोहरा बाजार, संग्रहालय, नोहकालिकाई फॉल्स, डबल डेकर रूट, सायबेरियन चर्च, हवामान वेधशाळा इत्यादी येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. यासोबतच चेरापुंजीतील सर्वात स्वच्छ गाव मावलिनॉन्ग हे देखील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT