Travel Diaries esakal
टूरिझम

Travel Diaries : कडाक्याच्या थंडीपासून दूर जाण्यासाठी भारतातल्या 'या' ठिकाणांना नक्की द्या भेट

जर या थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला कडाक्याच्या थंडीपासून कुठेतरी दूर मात्र, सुंदर भागात फिरायचे असेल तर त्यासाठी भारतातील काही ठिकाणे एकदम बेस्ट आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Travel Diaries : साधारणपणे अनेक जण असे मानतात की, थंडीच्या दिवसांमध्ये फिरायला जाणे हे अगदी योग्य आहे. त्यात ही काही जण थंड प्रदेशांमध्ये ही फिरायला जातात. मात्र, सगळ्यांनाच ही थंडी हवीहवीशी वाटते असे बिलकुल नाही. या थंडीच्या दिवसांमध्ये पर्वतीय भागात किंवा थंड प्रदेशात गेल्यावर आजारी पडण्याची जास्त शक्यता असते.

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. जर या थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला कडाक्याच्या थंडीपासून कुठेतरी दूर मात्र, सुंदर भागात फिरायचे असेल तर त्यासाठी भारतातील काही ठिकाणे एकदम बेस्ट आहेत. तिथे तुम्हाला जास्त थंडी जाणवणार नाही आणि तुम्ही मनसोक्त फिरू शकाल. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

गोवा

हिवाळ्यातील सुट्टीत फिरायला कुठे जायचे? असा प्रश्न मनात येताच आपल्याला सर्वात पहिले आठवते ते म्हणजे गोवा. गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक असलेले ठिकाण आहे. थंडीच्या दिवसांमध्ये अनेक जण गोव्याला आवर्जून फिरायला जातात. येथील दमट वातावरणामुळे तुम्हाला जास्त थंडी वाजणार नाही आणि तुम्ही येथील ठिकाणे एक्सप्लोअर करू शकाल.

Goa

येथील सुमद्रकिनारे, चर्च, मंदिरे आणि नाईटलाईफचा तुम्ही आनंद घेऊ शकाल. खास करून येथे शॉपिंग करायला अजिबात विसरू नका. यासोबतच गोव्यात खाण्याचे अनेक वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला येथील ट्राय करता येतील. येथील बीचेसवर तुम्ही जेट स्किईंग, स्पीड बोटिंग आणि वॉटरस्पोर्ट्सचा ही आनंद घेऊ शकाल.

महाबलीपुरम

जर तुम्हाला कडाक्याच्या थंडीपासून दूर रहायचे असेल तर तुम्ही महाबलीपुरमचा नक्कीच विचार करू शकता. तामिळनाडू राज्यातील हे ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. एवढच नाही तर हे ठिकाण ऐतिहासिक मंदिरांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे.

Mahabalipuram

महाबलिपुरममध्ये ७ व्या शतकातील एक सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर आहे. ज्याला भेट देण्यासाठी देश-विदेशातील लोक गर्दी करतात. या व्यतिरिक्त येथील शोर मंदिर प्रसिद्ध आहे. येथे गेल्यावर सोपस्टोन आणि ग्रॅनाईटच्या आकर्षक मूर्ती खरेदी करायला विसरू नका. महाबलीपुरमला गेल्यावर तिथल्या विलोभनीय समुद्रकिनाऱ्यांना ही तुम्ही भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT