these google Travel Tips will make your next trip more easier check details here
these google Travel Tips will make your next trip more easier check details here  
टूरिझम

फिरायला जाण्याचा विचार करताय? मग 'या' गुगल टिप्स ठरतील गेम चेंजर

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्याच्या दिवसात आपल्यापैकी बरेच जण फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करतात, देशात किंवा देशाबाहेर फिरायला जाताना तुमच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी तुम्हाला गुगल मॅप्स Google Maps चा चांगला उपयोग करता येऊ. तुमच्या ट्रिपचे नियोजन सहज करण्यसाठी गुगल फ्लाइट्स (Google Flights) मध्ये तुमच्यासाठी अनेक फीचर्स दिले आहेत. तुमच्या पुढील सहलीचे नियोजन करताना तुम्ही Google Maps ची मदत घेऊ शकता, तसेच प्रवासात तुम्हाला पडणाऱ्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे गुगल मॅपकडे आहेत. तुमची पुढील ट्रिप तुम्ही कोणत्याही चिंतेशिवाय मजेत घालवू शकाल. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर..

Google Maps चे पहिलं महत्वाचं फीचर म्हणजे, गुगल फ्लाईट्स, हे वापरून तुम्ही कोणत्याही तारखेसाठी विमान तिकीटांचे दर तपासू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचा प्रवास प्लॅन करताना अडचण येणार नाही. इतकेच नाही तर जर तुम्ही दूरच्या व्हेकेशन ट्रिपला जात असाल आणि तुम्हाला विमानतळाबद्दल ते कुठे आहे? तिथपर्यंत कसं पोहचायचं हे नीट माहीत नसेल किंवा विमानतळावर पोहचल्यावर तेथे खाद्यपदार्थ किंवा कॉफी शॉप शोधण्यासाठी Google Maps तुम्हाला मदत करू शकते.

फ्लाइटची किंमत किती असेल ते सहज जाणून घ्या

Google ने एक फीचरची घोषणा केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या डेस्टीनेशवर जाणाऱ्या फ्लाइट्सवर सर्वोत्तम ऑफर शोधता येतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत विमान तिकीटं पाहू शकता आणि पुढील तीन ते सहा महिन्यांत Google ला ठराविक किमतींपेक्षा कमी झाल्याचे आढळल्यास तुम्हाला ईमेल पाठवेल.

तुमच्या ब्राउझरवर फक्त Google Flights वर जा आणि तुमचे डेस्टीनेशन टाइप करा. प्रवासासाठी तुमच्या मनात विशिष्ट तारीख नसल्यास, सर्वोत्तम डील शोधण्यासाठी कोणत्याही तारखा निवडा.

तुम्हाला मोठ्या मॉलमध्ये पटकन स्टोअर शोधायचे असल्यास, Google Maps सर्व विमानतळ, मॉल्स आणि ट्रान्झिट स्टेशनसाठी त्याचा डायरेक्टरी टॅब घेऊन येत आहे. तुम्‍ही जेवणासाठी एखादे ठिकाण शोधण्‍याचा प्रयत्‍न करत असताना किंवा तुमच्‍या फ्लाइट पकडण्‍यापूर्वी शेवटच्‍या क्षणी पुस्तक किंवा इतर काही विकत घेताना हे मदत करू शकते. या टॅबमध्ये तुम्हाला ते ठिकाण कोणत्या वेळेस चालू किंवा बंद असेल तसेच ते कोणत्या मजल्यावर आहे ते देखील सांगेल. तुम्ही रेस्टॉरंट्स, स्टोअर्स, लाउंज आणि पार्किंग लॉट्स देखील पाहू शकता.

गर्दी किती आहे ते शोधी..

गुगल मॅप तुम्हाला रेस्टॉरंट किती गर्दी आहे हे देखील पाहू शकता. एखाद्या दुकानात किती गर्दी आहे, हे पाहण्यासाठी Google Maps ब्राउझ करा. Google ने त्यासाठी Google Maps मध्ये busyness tool डेव्हलप केले आहे. हे वापरून तुम्हाला रिअल टाइममध्ये तेथे किती गर्दी आहे, हे दाखवणारा चार्ट पाहण्यासाठी तुम्ही त्या स्टोअरचे लोकेशन शोधू शकता. यामध्ये एरिया बिझीनेस (Area Busyness) नावाचे एक नवीन फीचर वापरून तुम्हाला संपूर्ण मॅप पाहून तेथे कधी गर्दी असते ते देखील पहाता येईल.

नवीन फीचर वापरण्यासाठी, तुम्ही तुमच्या Android किंवा iPhone (किंवा तुमच्या काँप्युटरच्या ब्राउझरवर) Google App उघडता आणि सामान्य क्षेत्र शोधण्यासाठी नकाशात ब्राऊज करा. त्या ठिकाणी असलेल्या गर्दीची माहिती नकाशावर आपोआप दिसून येईल, त्यामुळे किती गर्दी आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला विशिष्टपणे ठिकाण शोधण्याची गरज नाही.

Google Maps तुमच्‍या प्रवासाचे चार्ट बनवू शकतात, तुमच्‍या फ्लाइट, हॉटेल, भाड्याने घेतलेली कार आणि रेस्टॉरंटचे रिझर्व्हेशन देखील तुम्‍हाला पटकन पाहू शकतात. यानंतर तुम्हाला तुमच्‍या ईमेल मध्ये चेक-इन वेळा आणि कंन्फर्मेशन नंबर शोधत बसावे लागणार नाही.

तुमची पुढील रिझर्व्हेशन्स पाहण्यासाठी:

1. Google Maps मध्ये, मेनू मध्ये सगळ्यात शेवटी सेव्ह केलेले (Saved) यावर टॅप करा.

2 आता रिझर्व्हेशन्स (Reservations) यावर टॅप करा . येथे, तुम्हाला तुम्ही केलेल्या आगामी रिझर्व्हेशन्स यादी दिसेल, जी Maps ने Gmail मधील ईमेलमधून काढलेली असेल.

3 . तारीख आणि ठिकाणांसह, रिझर्व्हेशन्सबद्दल अधिक पाहण्यासाठी आयटम पर्याय निवडा.

4 . ही यादी पाहण्यासाठी तुम्ही थेट Google Maps मध्ये सर्च बॉक्समध्ये "my reservations" देखील शोधू शकता.

आता Google Maps मध्ये करा रेस्टॉरंटचे रिझरव्हेशन

तुम्ही फिरायला गेला असाल आणि एखाद्या नवीन रोस्टॉरंटमध्ये जेवनासाठी तुम्हाला रिझरव्हेशन करायचे असते तर Google Maps तुम्हाला लंच किंवा डिनर रिझरव्हेशन बुक करण्यात मदत करू शकते.

1 . Maps मध्ये, खाण्याच्या ठिकाणांची यादी पाहण्यासाठी Map वर असलेल्या रेस्टॉरंट बटणावर टॅप करा .

2 तुमच्या आवडीचे रेस्टॉरंट निवडा आणि पॉप अप होणाऱ्या विंडोमध्ये, टेबल बुक करा.

लक्षात ठेवा तुम्ही कमीत कमी गर्दी असलेले ठिकाण निवडण्यासाठी वर नमूद केलेल्या फीचरचा वापर देखील करू शकता. तसेच, लक्षात ठेवा की काही रेस्टॉरंट जे जेवणासाठी बंद असतील तरी देखील ते डिलिव्हरी किंवा बाहेरील बसण्याची परवानगी देऊ शकतात.

Google Maps ऑफलाइन

तुमच्याकडे मोबाईल नेटवर्क कनेक्शन नसेल अशा रिमोट ठिकाणी जात आहात? तुम्ही ऑफलाइन असतानाही Google Maps वापरू शकता.

1 . तुम्ही बाहेर जाण्यापूर्वी, तुम्हाला मदत हवी आहे त्या लोकशनचे नकाशे App मध्ये शोधा

2. लोकेशन विंडोमध्ये, तळाशी असलेला मेनू वर खेचा .

3 . टॅबमधून उजवीकडे स्क्रोल करा आणि डाउनलोड वर टॅप करा आणि नंतर पुढील विंडोमध्ये पुन्हा डाउनलोड करा वर टॅप करा . तुम्ही निवडलेल्या ठिकाणाचे नकाशे तुमच्या फोनवर डाउनलोड करेल.

आता, तुम्ही ज्या ठिकाणाचा नकाशा डाउनलोड केला आहे त्या भागातील रस्ते शोधण्यासाठी तुम्ही Google Maps वापरत असताना, तुम्हाला नेटवर्क नसेल तरी देखील App ऑफलाइन नकाशावर स्विच करेल. लक्षात ठेवा की तुम्ही ऑफलाइन असल्याने, नकाशे रिअल-टाइम ट्राफीक माहिती देऊ शकणार नाही.

EV चार्जिंग स्पॉट्स आणि पेट्रोल पंप देखील शोधा

तुम्ही तुमचे इलेक्ट्रिक वाहन सुट्टीसाठी घेऊन जात असल्यास, चार्जिंग पोर्टसाठी अंदाजे वेटिंग वेळेसह, Google Maps तुम्हाला तुमच्या मार्गावरील EV चार्जिंग स्टेशन शोधण्यात मदत करू शकतात. तुम्ही तुमचा शोध कनेक्टर टाईपनुसार फिल्टर करू शकता. लक्षात ठेवा तुम्ही याच प्रकारे पेट्रोल पंप देखील शोधू शकता. त्यासाठी

तुमचे लोकेशन शेअर करा

तुम्ही फिरायला गेलात आणि तुमच्या ग्रुपपासून वेगळे झालात तर एकमेकांना शोधू शकत नासाल तर Google Maps तुम्हाला तुमचे मित्र शोधण्यात मदत करू शकते.

1. Google Maps मध्ये, वरच्या उजव्या कोपर्‍यात तुमच्या प्रोफाइल चिन्हावर टॅप करा आणि लोकेशन शेअरिंग वर टॅप करा .

2 _ लोकेशन शेअर करा वर टॅप करा आणि तुम्हाला तुमचे लोकेशन कोणासोबत शेअर करायचे आहे आणि तुम्हाला ते किती काळ शेअर करायचे आहे ते निवडा.

3. शेअर करा वर टॅप करा आणि Google Map तुम्ही निवडलेल्या प्रत्येकाला तुमचे लोकेशन पाठवेल.

4. तुम्हाला दुसर्‍याचे लोकेशन पहायचे असल्यास, विंडोच्या टॉपला असलेल्या त्या व्यक्तीच्या चिन्हावर टॅप करा आणि नंतर विनंती करा वर टॅप करा .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT