Women's Day 2024 esakal
टूरिझम

Women's Day 2024 : दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणे स्वर्गाहून सुंदर आहेत, महिलांनो सोलो ट्रॅव्हलिंगचा करा प्लॅन

Women's Day 2024 : खरं तर एकट्याने प्रवास करण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे, अनेक महिला कामातून जरा ब्रेक घेऊन, सोलो ट्रॅव्हलिंगचा पर्याय निवडताना दिसतात.

Monika Lonkar –Kumbhar

Women's Day 2024 : फिरायला जायला कुणाला आवडत नाही, ते तर सगळ्यांनाच आवडते. आजकाल जसा वेळ मिळेल तसे फिरायला जायला लोकांना आवडते. नवीन ठिकाणे एक्सप्लोअर करणे हा जणू तरूणाईचा ट्रेंड झाला आहे. यामध्ये केवळ पुरूष आघाडीवर आहेत, असे अजिबात नाही, तर महिला देखील यात आघाडीवर आहेत.

खास करून सोलो ट्रॅव्हलिंगला जायला अनेक महिलांना आवडते. सोलो ट्रॅव्हलिंग हा महिलांमध्ये खास ट्रेंड बनला आहे. खरं तर एकट्याने प्रवास करण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे, अनेक महिला कामातून जरा ब्रेक घेऊन सोलो ट्रॅव्हलिंगचा पर्याय निवडतात.

आता अवघ्या काही दिवसांवर जागतिक महिला दिन येऊन ठेपला आहे. या महिला दिनानिमित्त जर तुम्ही देखील स्वत:ला एक छान ट्रीट देऊ इच्छित असाल किंवा सोलो ट्रॅव्हलिंगला जाण्याचा विचार करत असाल, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.

आज आम्ही तुम्हाला महिलांच्या सोलो ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट असणाऱ्या दक्षिण भारतातील काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

गोकर्ण

दक्षिण भारतातील एक सर्वोत्तम ठिकाण म्हणून, गोकर्णला ओळखले जाते. येथील निसर्ग आणि सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात. हे ठिकाण अशा ठिकाणांपैकी एक आहे, जिथे महिला कधीही एकट्या फिरायला जाऊ शकतात.

कर्नाटकातील कारवारच्या किनाऱ्यावर स्थित असलेले हे ठिकाण भारतातील स्वच्छ-सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे आणि मनमोहक निसर्गासाठी ओळखले जाते. शिवाय, गोकर्ण हे ठिकाण महिलांसाठी सर्वात सुरक्षित मानले जाते. त्यामुळे, तुम्ही या ठिकाणी सोलो ट्रॅव्हलिंगला जाण्याचा नक्कीच प्लॅन करू शकता.

गोकर्णला आल्यानंतर ओम बीच, हाफ मून बीच, गोकर्ण बीच, महाबळेश्वर मंदिर आणि भद्रकाली मंदिर यांसारखी प्रसिद्ध ठिकाणे एकट्याने फिरू शकता. (Gokarna)

उटी

तामिळनाडू राज्यातील सर्वात सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळ म्हणून उटी या शहराला खास करून ओळखले जाते. निलगिरी पर्वतरांगांमध्ये वसलेले हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी दरवर्षी देश-विदेशातील असंख्य पर्यटक भेट देत असतात. उटी हे ठिकाण महिलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणून ओळखले जाते.

जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलिंगसाठी तामिळनाडूतील एखाद्या उत्तम ठिकाणी भेट देण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही उटीला जायला काहीच हरकत नाही. येथील सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये तुम्ही हरवून जाल, यात काही शंका नाही. यासोबतच, उटीमध्ये तुम्ही उटी लेक, दोड्डाबेट्टा पीक, पायकारा धबधबा, आणि बोटॅनिकल गार्डनसारथी प्रसिद्ध ठिकाणे तुम्ही नक्कीच एक्सप्लोअर करू शकता. (Ooty)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या अन् पेट्रोल टाकूनही जाळलं!

Horoscope 2026 : मेष ते मीन राशीपर्यंत..! 2026 वर्ष तुमच्यासाठी कसे असेल? वाचा नव्या वर्षाचं संपूर्ण वार्षिक राशिभविष्य

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

PCMC Election: अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक! पिंपरी-चिंचवडमध्ये तिसऱ्या पक्षाची एन्ट्री होणार? निवडणुकीसाठी नवा डाव टाकला

Solapur News : "पोलिसात दाखल गुन्ह्यातील सर्वाधिक गुन्हे हे दारूचे"- पो.नि.दत्तात्रय बोरीगिड्डे!

SCROLL FOR NEXT