tigress on the trail campaign for adventure and safe tourism for women Marathi Article 
टूरिझम

एकदम भारीच! आता महिलांच्या सुरक्षित पर्यटनासाठी 'टाइग्रेस ऑन द ट्रेल' 

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील खासकरुन महिलांसाठी साहसी व सुरक्षित पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 19 नोव्हेंबर 2020 रोजी मुख्यमंत्री निवासामध्ये महिलांच्या दुचाकी मोहिमेंतर्गत 'टाइग्रेस ऑन द ट्रेल' या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी पर्यटनचे शिव शेखर शुक्ला म्हणाले की, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे, 'एकल महिला प्रवाशांसाठी' मध्य प्रदेश पूर्णपणे सुरक्षित असून पर्यटनासाठीही राज्य तितकेच लोकप्रिय असल्याचे पर्यटकांना भासवून देण्याचा उद्देश आहे. 

दरम्यान, या मोहिमेत देशभरातील 15 महिलांनी दुचाकी चालवत सहभाग नोंदवला होता. भोपाळमधून या मोहिमेस प्रारंभ होऊन मढई, पेंच, कान्हा, बांधवगड, पन्ना आणि खजुरा मार्गे या मोहिमेची समाप्ती झाली. "टाइग्रेस ऑन द ट्रेल" ही मोहीम 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. श्री. शुक्ला म्हणाले, या यात्रा मार्गाची रचना खूपच सुंदर करण्यात आली होती. या मोहिमेतील सहभागी महिलांना पर्यटनाचा देखील आनंद लुटता यावा, यासाठी मार्गात बदल करण्यात आले होते. राज्यातील विहंगम दृश्यांचा आस्वाद घेत या वाहनचालकांना प्रवासाचा थरार अनुभवता येईल आणि मध्य प्रदेशातील आकर्षक ठिकाणी पर्यटकांची ओळख करुन, ते पर्यटकांना या पर्यटन स्थळांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेविषयी माहिती देऊ शकतील, हा यामागचा उद्देश होता.

शुक्ला पुढे म्हणाले, राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी नवकल्पना राबविण्यात मध्य प्रदेश टुरिझम बोर्ड नेहमीच अग्रणी असते. या कालावधीत पर्यटकांना जागृतीसह पर्यटन आणि राज्यातील प्रमुख वन्यजीव पर्यटन स्थळे, मढई, पेंच, कान्हा, बांधवगड, पन्ना या राष्ट्रीय उद्यानांच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT