tips for buying gifts for family and friends during travelling Marathi article 
टूरिझम

प्रवासात प्रियजनांसाठी भेटवस्तू खरेदी करताना 'या' टिप्स ठरतील उपयोगी

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : जेव्हा आपण कुठेही फिरायला जातो विशेषतः परदेशात अशा वेळी सहाजीकपणे आपण कुटुंबीय व मित्रांसाठी छोट्या भेटवस्तून आवर्जून घेतो . मात्र, आपल्या मित्रांसाठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी भेटवस्तू खरेदी करणे हे बऱ्याचदा एखाद्या आव्हानापेक्षा कमी ठरत नाही.  

बऱ्याचदा आपम कुठे तरी फिरयला गेलेले असता पण तुमच्या मनात मात्र कायम यादी बनवत राहता की घरातील कोणत्या व्यक्तीसाठी काय विकत घेता येईल. आज आपण काही सोप्या पध्दती, टिप्स जाणू घेणार आहेत ज्यांचा वापर करुन तुम्ही ही खरेदी अगदी कमी वेळेत सोप्या पध्दतीने करु शकाल. 

व्यवस्थित प्लनिंग करा

खरेदीसाठी बाहेर जाण्यापूर्वी त्या जागेबद्दल माहिती वाचा त्या ठिकाणी काय मिळू शकतं याचा अंदाज त्यामुळे तुम्हाला येईल. चांगल्या भेटवस्तू फक्त दुकानांमध्ये मिळतील असे काही नाही. तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू खाद्यपदार्थांची दुकाने,  स्टेशनरी दुकान, हस्तकला केंद्र किंवा रस्त्याच्या कडेला असलेले बाजारात देखील मिळू शकते. आपण जिथे जात आहात तिथे स्थानिक भाषेची काही सोपी वाक्य शिका. बोलणी करताना त्यांचा वापर करा. त्यामुळे तुमची खरेदी आणखी सोपी होईल.

तुमचे बजेट सांभाळा

'मला येथे अशी वस्तू मिळणार नाही', 'थोडेच तर पैसे जास्त लागताएत',  ' अशी संधी एकदाच  मिळते', अशा विचारांमुळे तुमची खरेदी बजेटच्या बाहेर जाते हे लक्षात ठेवा . परंतु सुट्टी संपल्यानंतर, जेव्हा आपण आपले क्रेडिट कार्ड बिल पाहता तेव्हा या सगळ्याबद्दल निश्चितच वाईट वाटेल.  ज्यांच्यासाठी भेटवस्तू घ्यायची आहे अशा लोकांची यादी तयार ठेवा. या यादीतील नावे एकेक करून वाढवू नका.

छोट्या वस्तू ठरतात बेस्ट गीफ्ट

केवळ आपण महागड्या भेटवस्तू घेतल्यास तरच त्या सगळ्यांना आवडतील असे काही नाही. .भेट म्हणून छोट्या छोट्या गोष्टी देऊन आपण लोकांची मने जिंकू शकता. लक्षात ठेवा की आपण जी छोटी गोष्ट आणत आहात ती आपल्या शहरात मिळत नसते, त्यामुळे तिचे महत्व राहते. 

स्थानिक लोकांप्रमाणेच करा खरेदी

शॉपिंग ट्रिपमध्ये भटवस्तू खरेदी करण्यासाठी पर्यटक अनेकदा प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी जातात. अशा ठिकाणी आधीपासूनच गर्दी असते आणि वस्तू देखील महाग असतात. त्यामुळे नेहमी स्थानिक लोक ज्या दुकानात जातात त्याच दुकानांचा शोध घ्या अशा दुकानांमध्येच सर्वात चांगल्या आणि खिशाला परवडतील अशा वस्तू मिळतात. म्हणून पुढच्या वेळी आपण फिरायला जाल तेव्हा स्थानिक बाजारपेठांमध्ये फिरा.

धीर ठेवा

प्रत्येकवेळी तुमच्या समोर असलेली तेवढी एकच गोष्ट बेस्ट असते असे नाही. बाजारात त्याहून देखील चांगल्या वस्तू मिळू शकतात. त्यामुळे भेटवस्तू खरेदी करताना त्या तुमच्या ट्रिपच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्या खरेदी कारा. असे केल्याचा सगळ्यात मोठा फायदा  हा असतो की तुमच्या ट्रिपमध्ये तुम्हाला बाजरात मिळणाऱ्या वस्तूंचा बऱ्यापैकी अंदाज आलेला असतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

२ वर्ष चांगली चालली अन् वाहिनीने अचानक बंद केली लोकप्रिय मालिका; प्रेक्षक संतापले, म्हणतात- काय मूर्खपणा...

Latest Marathi News Updates : पाकिस्तानने आशिया कपवर बहिष्काराचा निर्णय बदलला? खेळाडूंनी सोडलं हॉटेल

Nepalese Jhol Momo Recipe: झणझणीत, आंबट आणि शेंगदाण्याच्या चवीचे, नेपाळचे खास झोल मोमो एकदा नक्की ट्राय करा

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT