Mayurbhanj Mayurbhanj
टूरिझम

ओडिशाचे मयुरभंज आहे निर्सगसंपन्न ठिकाण; जेथे मिळतो आनंद!

हवामान खूपच आनंददायक असते आणि पर्यटकांना फिरणेही सोपे जाते.

भूषण श्रीखंडे

जळगाव ः भारताच्या (India) पूर्वेकडील ओडिशा (Odisha) हे अतिशय सुंदर नैसर्गिक राज्य आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरजवळ मयुरभंज हा एक छोटासा अतिशय सुंदर जिल्हा आहे. येथे अनुसूचित जमातीचे लोकांची संख्या असून संथाल भाषा येथे बोलली जाते. तर ओडिया भाषा शहरी भागात अधिक वापरली जाते. ब्रिटीश (British) राजवटीत हा जिल्हा शाही राज्य असायचा. येथील हवामान (Weather) खूप अतिशय चांगले असल्याने येथे पर्यटनासाठी ओडीशातून नव्हे तर संपूर्ण भारतातून पर्यटक मयूरभंजला (Mayurbhanj) जाणे पसंत करतात. इथे बर्‍याच आकर्षक ठिकाण असून निसर्गाच्या तुम्हाला अनुभव तुम्हाला मिळेल. तर चला जाणून घेऊ या ठिकाणाबद्दल..(mayurbhanj in odisha is a great place for tourism)

असे जाऊ शकतात मयूरभंजला

रेल्वे, विमान आणि वाहनाने आपण मयूरभंजला जाऊ शकता. इथल्या रेल्वे स्थानकाबद्दल बोलायचे झाले तर ते बारीपाडा-हावडा-चेन्नई रेल्वे कॉरिडोरला जोडलेले आहे. येथून भुवनेश्वर आणि कोलकाता नियमित गाड्या आहे. कोलकाताहून रेल्वे सहज मयूरभंजच्या बारीपाडाला जावू शकता. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 195 कि.मी. अंतरावर आहे. विमानाने भुवनेश्वरला पोहोचू शकता. तसेच मयूरभंज जिल्ह्यात पोहोचण्यासाठी रस्ता यंत्रणा चांगली आहे. संबलपूर, पुरी, बोलंगीर, झारग्राम, अंगुल, रांची तसेच कोलकाता आणि ओडिशा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वातानुकूलित बस आहे. तसेच खाजगी वाहनाने देखील जावू शकतात.

Mayurbhanj

या महिन्यांमध्ये जावे मयूरभंजला

येथे भेट देण्याचा विचार करत असाल तर आपण सप्टेंबर ते मार्च दरम्यान जावू शकता. या महिन्यांत इथले हवामान खूपच आनंददायक असते आणि पर्यटकांना फिरणेही सोपे जाते. येथे आपल्याला बर्‍याच नवीन गोष्टींचा अनुभव येईल.

सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान

बारीपाड्याच्या जिल्हा मुख्यालयापासून सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान हे केवळ 17 किलोमीटर अंतरावर आहे. या उद्यानाचा परिसर मोठा असून हे व्याघ्र प्रकल्प आहे. येथे हिरव्यागार व घनदाट जंगल आणि वन्य प्राण्यांच्या प्रजाती आहेत. तसेच विविध प्रकारचे प्रकारचे पक्षी देखील आढळतील. तसेच येथे बरीहिपाणी आणि डोरंडा धबधबे देखील आहेत जे पर्यटकांना खास आकर्षीत करतात.

मोहक देवकुंड धबधबा

देवकुंड धबधबा सिमलीपाल जंगलातील उदाला विभागात आहे. तो भारतातील जूना धबधबा आहे. या धबधब्या जवळ दुर्गा देवीचे मंदिर आहे. या मंदिरात पूजेची आणि धार्मिक विधी पूर्ण निष्ठेने केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT