टूरिझम

वडोदरा शहरात फिरायचयं, हे आहेत सर्वोत्तम ठिकाणे

भूषण श्रीखंडे

जळगाव ः गुजराथ राज्याची कला नगरी आर्ट ऑफ सिटी आणि संस्कारी नगरी म्हणूनही ओळख ही वडोदरा शहराची आहे. हे शहर विश्‍वमित्री नदीच्या काठावर वसलेले आहे. इतिहास आणि संस्कृतीचा वारसा या शहराला लाभला असून येथे शाही इतिहास, भव्य महल, संग्रहालये, वाडे, गार्डन्स, मंदिरे, बाजारपेठ आणि राजघराणे गायकवाड यासाठी ओळखले जाणारे हे शहर आहे.

सयाजी गार्डन

महाराज सयाजीराव गायकवाड यांनी हे 100 एकर क्षेत्रात उद्यान तयार केले आहे.  देशाच्या पश्चिम भागातल्या सर्वात मोठ्या सार्वजनिक बागांपैकी एक मानले जाते. सरदार पटेल तारामंडळ, बडोदा संग्रहालय आणि पिक्चर गॅलरी, एक टॉय ट्रेन,  प्राणीसंग्रहालय, मत्स्यालय वेगवेगळ्या जातींचे वृक्ष आहे. 

लक्ष्मी विलास पॅलेस 

भारतातील भव्य वाड्यांपैकी एक लक्ष्मी विलास पॅलेस हा वाडा बडोद्याच्या राजघारण्याचा आहे महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरा यांनी बांधलेला विशाल राजवाडा आतापर्यंतचा सर्वात मोठा खाजगी निवासस्थान आहे. लंडनमधील बकिंघम पॅलेसपेक्षा चार पट मोठा आहे. हे इंडो-सारासेनिक आर्किटेक्चरल शैलीचे एक चांगले उदाहरण आहे. वडोदरामध्ये पर्यटन स्थळांपैकी एक आहे राजवाडा असून या पॅलेसमध्ये मोती बाग पॅलेस आणि महाराजा फतेहसिंग संग्रहालय असलेले दरबार हॉल हे प्रमुख आकर्षणे आहेत.

वडोदरा संग्रहालय, चित्र गॅलरी

वडोदरा संग्रहालय आणि चित्र गॅलरी लंडन सायन्स म्युझियम आणि व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमच्या धर्तीवर डिझाइन केलेली आहे. हे भूशास्त्र, पुरातत्व आणि नैसर्गिक इतिहासाशी संबंधित कलाकृतींचा संग्रह येथे आहे. या संग्रहालयाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणा महाराज सयाजीराव गायकवाड तिसरा यांच्या वैयक्तिक संग्रहातील विविध वस्तू येथे आहे. वडोदरा संग्रहालयाचे मुख्य आकर्षक निळ्या व्हेलचा सांगाडा आणि इजिप्शियन ममीचा समावेश आहे.

ईएमई मंदिर

ईएमई मंदिर हे भारतीय लष्कराद्वारे व्यवस्थापित केलेले एक शिव मंदिर आहे. मंदिर अल्युमिनियमच्या चादरीने झाकलेले आहे. मंदिराची भौगोलिक रचना अदभूत आहे. 7 व्या ते 15 व्या शतकातील शिल्प हे मंदिराच्या आसपासच्या बागेचे सौंदर्य आहे.

सूर्य नारायण मंदिर

नावाप्रमाणेच सूर्य नारायण मंदिर सूर्य देवाला समर्पित आहे. मंदिर भव्य पद्धतीने बांधले गेले आहे आणि हे मंदिर भव्य वास्तू वैशिष्ट्येपूर्ण आहे. असे मानले जाते की सूर्य देवाची आराधना केल्यास आजारपणातून मुक्तता मिळेल. या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते.

सुर सागर तलाव

वडोदरा शहराच्या मध्यभागी सूर सागर हा एक आकर्षक तलाव आहे. जो वर्षभर पाण्याने भरलेले असून येथील शांत वातावरण, संध्याकाळी या तलावावर बसून आपण इथल्या सौंदर्याचे कौतुक करू शकता. तलावाच्या मध्यभागी १२० फूट उंच शिव्यांची मूर्ती असून ती वडोदरामधील सर्वात सुंदर ठिकाण हे असल्याचे मानले जाते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT