Best South Indian Hill Stations
Best South Indian Hill Stations  
टूरिझम

निवांतपणा हवा, तर या थंड हवेच्या ठिकाणांना एकदा तरी भेट द्याच

सकाळ डिजिटल टीम

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत एकापेक्षा एक निसर्गस्थळे आहेत. त्याचे फोटो अनेक वर्षे तुम्हाला या स्थळांची आठवण करुन देईल. मात्र येथे सर्वांत अप्रतिम म्हणजे सुंदर अशी पर्वते. भारतातील पर्वतांचे सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून लोक येथे येतात. भारताच्या पश्चिम घाटात एक हजार 600 मीटर लांबपर्यंत पर्वत रांगा आहेत. जे गुजरातपासून दक्षिण भारताच्या कन्याकुमारीपर्यंत पसरल्या आहेत. या पर्वतरांगांना सह्याद्री पर्वत म्हटले जाते. येथे अनेक सुंदर ठिकाणे आहेत जी पाहण्यासाठी पर्यटक लांबून येतात. जर तुम्हालाही सुंदर पर्वतराजी पाहायचे असेल तर तुम्ही दक्षिण भारतातील या ठंड हवेच्या ठिकाणांना भेटी द्यायला हवे...

कोडाईकनाल

तामिळनाडू राज्यातील कोडाईकनाल हे भारतातील सर्वांत प्रसिद्ध हनिमून डेस्टिनेशनपैकी एक आहे. हे स्थळ धुक्यांनी वेढलेले असते. सुंदर अशी ओढ-नाले वाहत असतात. कोडाईकनालचा अर्थ आहे, वनांचा हार आणि वास्तवात हे ठिकाण येथील सुंदर वनराईने नटलेले आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सात हजार 700 फुट उंचावर आहे. एकदा तुम्ही येथे आलात तर वेगळी अनुभूती मिळेल. दररोजच्या धावपळीपासून दूर अशा कोडाईकनालमध्ये तुम्ही आनंदाचे काही क्षण साठवून ठेवू शकाल. येथील निसर्गाशी तुम्ही एकरुप व्हाल. बायकिंग किंवा ट्रेकिंग ट्रेल्सचाही आनंद घेता येऊ शकते. तसेच मोठ्या जंगलात हिरवाईचा आनंद घेऊ शकता.

वागामोन

वागामोन हे केरळमधील सुंदर असे पर्यटनस्थळ आहे. हिरवेगार पर्वते, खाड्या आणि वाहणाऱ्या नद्या आपल्याकडे लोकांना आकर्षित करते. गोंगाट आणि गर्दीपासून सुटका हवी असलेल्या लोकांसाठी शांतीचे हे स्थळ आहे. चहाची मळे, ताजी हवा, लहान-लहान ओढे, आकर्षक गवताने वेढलेले मैदानांनी वेढलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 1200 मीटर उंचावर आहे. वागामोनमध्ये पोहोचणे हे एक असाधारण अनुभव आहे. या ठंड हवेच्या ठिकाणाजवळ तीन सुंदर पर्वतांची श्रृंखला आहे. जिथे थंगल, मुरुगन आणि कुरिस्मला पर्वते आहेत. याची अनुभूती अद्भूत आहे. आनंद आणि मनशांतीचा अनुभवासाठी वागामोन स्थळ उत्तम ठरते. खोऱ्यात वाहणारी थंडी आणि नरम हवेमुळे येथे शांत वातावरण तयार होते.



टाडा

तामिळनाडू- आंध्र प्रदेशच्या सीमेवर स्थित टाडा शहरातील गोंगाटापासून दूर नेणारे स्वर्गासारखे स्थळ आहे. जर तुम्ही ग्रामीण जीवनाचा एक अनुभव घेऊ इच्छिता का? तर चेन्नईपासून जवळपास एका तासाच्या अंतरावर हे सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. येथे जाऊन तुम्ही निसर्गाच्या सौंदर्याचा पूरेपूर आनंद घेऊ शकता. तसेच मनशांतीही मिळवू शकता. या शांत स्थळी सुंदर शेती, हिरवेगार पर्वते आणि एक अप्रतिम ओढा तुम्हाला कॅमेऱ्यात कैद करायला उद्युक्त करेल. हे कॅम्पिंग, ट्रॅकिंग आणि राॅक क्लायबिंगसाठी एक चांगला पर्याय आहे. येथे दोन संस्कृतींचा संगम झालेले दिसतो. कारण टाडा हे आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या दोन राज्यांच्या मधोमध वसले आहे. वास्तवात जर तुम्ही आपल्या दररोजच्या आयुष्यातील काही सुंदर क्षण गोळा करु इच्छित असाल तर हे सर्वोत्तम ठिकाण आहे. त्याला जरुर भेट द्या.
 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT