Ziro Valley Tourism  esakal
टूरिझम

Ziro Valley Tourism : भारतातल्या या ठिकाणाचं नावं आहे झिरो, जाणून घ्या का खास आहे हे शहर

Arunachal Pradesh Tourism Destination :झिरो हे ठिकाण सौंदर्यांच्या बाबतीत हजारपटीने सर्वोत्तम आहे. हे ठिकाण कुठे आहे, त्याची खासियत काय आहे, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Arunachal Pradesh Ziro Valley Tour Destination Know Here :

आपल्या  देशात अशी अनेक ठिकाणे आहेत. ज्यांची नावं विचित्र वाटतात. अन् प्रत्यक्षात ते ठिकाण भलतच असतं. गणितातील झिरो हा आकडा महत्त्वाचा आहे. पण, या झिरोवरून असलेलं एका ठिकाणाचं नाव तुम्हाला कोड्यात टाकणारं आहे.

कारण, झिरो हे ठिकाण सौंदर्यांच्या बाबतीत हजारपटीने सर्वोत्तम आहे. हे ठिकाण कुठे आहे, त्याची खासियत काय आहे. तिथे काय-काय पाहता येईल, याबद्दल जाणून घेऊयात. (Tourism News)

आपल्या देशात असलेला ईशान्य भागात सात राज्यांची गणना होते. ही सात राज्ये म्हणजे आसाम, त्रिपुरा, मणिपूर,मिझोरम, नागालँड, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश. यांना सप्त भगिनी असे संबोधले जाते. निसर्ग सौंदर्यांने नटलेल्या या ठिकाणांपैकीच अरूणाचल प्रदेशमध्ये झिरो हे ठिकाण आहे.  

अतिशय सुंदर आहे. अरुणाचल प्रदेश हे या प्रदेशातील सर्वात सुंदर राज्य आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देण्यासाठी येतात. या राज्यात झिरो नावाची जागा आहे. हे एक हिल स्टेशन आहे, जिथे निसर्गसौंदर्याने नटलेले आहे.  

झिरो हे ठिकाण निसर्गसौंदर्यांन नटलेलं आहे

नाव झिरो असले तरी १०० पेक्षा अधिक शाळा

हे छोटे पण सुंदर हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून ५५३८ फूट ते ८००० फूट उंचीवर आहे. या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त खासगी आणि शासकीय शाळा आहेत. या शहराचे नाव झिरो असले तरी अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक साक्षरता असलेले हे शहर आहे. येथील साक्षरतेचे प्रमाण ६६ टक्के आहे.

हे शहर थंड हवेचे ठिकाण असल्याने पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. झिरो देशभरातील पर्यटकांना आकर्षित करते. तथापि, अरुणाचल प्रदेशला भेट देण्यासाठी, तुम्हाला तेथील सरकारकडून इनर लाइन परवाना घ्यावा लागतो.

या ठिकाणची छोटी गावं

तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता. झिरो हे खास आदिवासी गावांसाठी प्रसिद्ध आहे. या छोट्याशा हिल स्टेशनमध्ये इतर जमातीही राहतात. इथे काही भटक्य विमुक्त जातीचेही लोक राहता. जे वेळोवेळी घरे बदलत राहतात. त्यांचे कपडे, राहणीमान, खाद्यपदार्थ, भाषा, बोलीभाषा, शारीरिक वैशिष्टय़े आणि राहणीमान खूप भिन्न आहे.

झिरो ठिकाणाला भेट देण्याची ठिकाणे

झिरो हे ठिकाण एक सुंदर टेकडी आहे. येथे आल्यावर तुम्हाला दूरवर पसरलेल्या अथांग अशा शहराचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल. यामुळेच लोक या ठिकाणी येतात आणि निसर्गसौंदर्य पाहण्याचा आनंद घेतात. जर तुम्ही झिरोला भेट देणार असाल तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या.

सिद्धेश्वरनाथ मंदिर

सिद्धेश्वर नाथ मंदिर

या ठिकाणी सिद्धेश्वरनाथ मंदिर आहे. हे मंदिर शिवभक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. डोंगर कपाऱ्यात असलेले हे शिवलिंग २५ फूट उंच आणि २२ फूट रुंद आहे. या ठिकाणी नेहमीच भाविकांची वर्दळ असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी रेल्वेची 'बुलेट' गती! ३ कोटी भाविकांच्या गर्दीसाठी नाशिक रोडसह ५ स्थानकांचा कायापालट

Private Video Leak: पॉर्न सर्च करताना स्वतःचाच व्हिडिओ दिसला! हॉटेलमधील Hidden Camera मुळे व्हायरल झाले खासगी क्षण, कपल हादरलं

Bhaucha Dhakka Week 4 : "तुला बरबाद करेन" धमकी देणाऱ्या रुचिताला दीपालीचं रितेशसमोर चॅलेंज

Pune News : बुधवार पेठेतील बांगलादेशी तरुणीची माहिती लपवली; महिला पोलीस हवालदाराला केले निलंबित

Tanaji Sawant Audio Clip: ''कोट-दोन कोट जाऊ द्या... व्हॉट्सअ‍ॅपला यादी टाका'', तानाजी सावंतांनी मतदानासाठी पैसे वाटले? क्लिप व्हायरल

SCROLL FOR NEXT