Baikal Lake Sakal
टूरिझम

Tourism News: जगातलं सर्वात खोल सरोवर कोणतं आहे? जाणून घ्या त्याबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी

प्राचीन काळी पाण्याची कमतरता लक्षात घेऊन लोकांना पाणीपुरवठा करता यावा म्हणून तलावांची निर्मिती करण्यात आली होती. त्याच वेळी, काही तलाव नैसर्गिक देखील आहेत

वैष्णवी कारंजकर

जगातील प्रमुख जलस्रोतांमध्ये नद्या आणि तलावांना विशेष महत्त्व आहे. प्राचीन काळापासून अनेक संस्कृती नद्यांच्या काठावर जन्मल्या आणि विकसित झाल्या. आज जगात अनेक छोटी-मोठी शहरे नद्या आणि तलावांच्या काठावर वसलेली आहेत. एकट्या भारतात मोठ्या संख्येने तलाव आहेत, त्यापैकी बहुतेक उदयपूरमध्ये आहेत. त्यामुळेच उदयपूरला तलावांचे शहर असंही म्हटलं जातं.

कारण, प्राचीन काळी पाण्याची कमतरता लक्षात घेऊन लोकांना पाणीपुरवठा करता यावा म्हणून तलावांची निर्मिती करण्यात आली होती. त्याच वेळी, काही तलाव नैसर्गिक देखील आहेत. पण जगातील सर्वात खोल तलाव कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल, तर तुम्हाला या लेखाद्वारे याबद्दल माहिती मिळेल.

जगातील सर्वात खोल सरोवर बैकल सरोवर आहे. हे सरोवर रशियामध्ये आहे. हे सरोवर त्याच्या खोलीसाठी जगभरात ओळखले जाते. हा तलाव पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येतात. हे बैकल सरोवर सुमारे १७०० मीटर म्हणजेच १.७ किलोमीटर खोल आहे. हा तलाव गोड्या पाण्याचा प्रमुख स्त्रोत आहे आणि त्यासोबतच गोड्या पाण्याची झाडेही इथं आढळतात.

बैकल तलाव आणखी एका कारणासाठी ओळखला जातो. हे सरोवर सुमारे २,५०० दशलक्ष वर्षे जुनं असल्याचं म्हटलं जातं, ज्यामुळे तो जगातील सर्वात जुना तलाव आहे.

जगातील सुमारे 20 टक्के पाणीसाठा

बैकल तलाव हे गोड्या पाण्याचा एक मोठा स्रोत आहे. जगातील गोठलेलं पाणी बघितलं तर जगातील २० टक्के पाणी या सरोवरात आरक्षित आहे. यामुळेच या सरोवराची जगातील पाण्याच्या प्रमुख स्त्रोतांमध्ये गणना होते.

जागतिक वारसा यादीत समाविष्ट

बैकल सरोवराचे महत्त्व लक्षात घेऊन १९९६ मध्ये युनेस्कोने या तलावाचा जागतिक वारसा यादीत समावेश केला. अशा परिस्थितीत या तलावाच्या पर्यटनासाठी दरवर्षी देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Rate: ग्राहकांना फटका, शेतकऱ्यांना नाही दिलासा; गोकुळने गाय दुधाचा विक्री दर वाढवला

Latest Marathi News Live Update : गोकुळकडून गाय दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ

एकतर तुम्ही मरणार किंवा... 'तुला जपणार आहे' फेम अभिनेत्याचा हात पाहून गुरुजींनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली

Indian Cricket: द्रविडने नाकारला गंभीरचा 'सुपरस्टार कल्चर'चा दावा; म्हणाला, "कोणत्याही खेळाला हिरोची गरज आणि..."

Thane Traffic: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'हा' रस्ता २०२७ पर्यंत बंद; कोणत्या वेळेत वाहतूक सुरू राहणार?

SCROLL FOR NEXT