Tiger 
टूरिझम

भटकंती : भुरळ घालणारा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

सकाळवृत्तसेवा

हिरव्यागार वनराईमुळे पश्‍चिम घाटाचे क्षेत्र नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. याच निसर्गाच्या कुशीत चांदोली व कोयना अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे. त्यातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. चांदोली नॅशनल पार्क व कोयना अभयारण्याला एकत्र करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तयार केला आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्याचे एकत्रीकरण करून सुमारे १ हजार १६६ चौरस किलोमीटरचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र आहे.

वाघांबरोबरच बिबटे, गवा, चितळ, सांबर व हरिण प्राण्यांनाही या प्रकल्पात संरक्षण मिळाले आहे. जंगलात वाघ असणे समृद्ध जंगलाचे प्रतीक आहे. जंगलात असलेल्या अन्न साखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. वाघांमुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि तृणभक्षी प्राण्यांचे समतोल साधण्याचे काम होते. येथे पर्यटनासही चांगला वाव मिळाला आहे. पर्यावरण संतुलन राखण्याबरोबरच निरोगी श्वासही मिळतो. व्याघ्र प्रकल्पात मोठी जैवविविधता आहे. दुर्गम, उतार असलेले डोंगराळ भाग आणि घनदाट जंगल असे व्याघ्र प्रकल्पाचे स्वरूप आहे. जंगलात अनेक प्रकारच्या प्रजातीच्या वनस्पती असल्याचा अंदाज आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाणलोट क्षेत्र, झरे, धबधबे आहेत. नद्यांचा उगम येथूनच आहे. नद्यांवर धरणाची निर्मिती याच भागात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरीच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात कपारींमध्ये दुर्मीळ वनस्पती, प्राणी सापडतात. व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तर बाजूला प्रतापगड व दक्षिण टोकाला विशाळगड आहे. पवनचक्‍क्‍यांचा भाग म्हणूनही परिसराची ख्याती सर्वदूर आहे. त्यामुळे पवनचक्‍क्‍यांचे स्थळ असलेल्या वनकुसवडे पठारावरही पर्यटकांची विशेष गर्दी असते. व्याघ्र प्रकल्पात कोयना, शिवसागर जलाशय व चांदोली, वसंत सागर महत्त्वाची दोन धरणे आहेत.

व्याघ्र प्रकल्पात काय पाहाल? 
किल्ले :
महिमागड (रघुवीर घाटात), वासोटा, पालीचा किल्ला, जंगली जयगड, भैरवगड, प्रचितीगड, गुणवंतगड, नायकिणीचा वाडा, कोकण खिंड

डोंगरावरील मंदिरे : उत्तरेश्वर, पर्वत, चकदेव, नागेश्वर, उदगीर, येडोबा, नाईकबा, जळव जोतिबा, जानाई, श्रीराम मंदिर, रामघळ, धारेश्वर या धार्मिकसह घेरादातेगड व तेथील तलवारीच्या आकाराची विहीर.      

धबधबे : ओझर्डे धबधबा, कंदार डोह, नेहरू गार्डन

जंगल भ्रमंती वाटा : मेट इंदोली ते वासोटा, नवजा ते जंगली जयगड, कोठावळे ते भैरवनगड, पानेरी ते पांढरपाणी, झोळंबीचा सडा, खुंदलापूर ते झोळंबी, चांदोली ते धरण निवळे. 

पवनचक्क्या : पवनचक्क्यांचा तालुका म्हणून या परिसराची ख्याती आहे. वनकुसवडे परिसरातील थेट आभाळाशी स्पर्धा करणाऱ्या पवनचक्क्या पाहताना आपण हरखून जातो. या भागातही आता पर्यटन वाढले आहे. हा परिसरही पाहण्यासारखाच आहे.

राहण्याची सोय
नाणेल येथे टेंटमध्ये खासगी संस्थेकडून राहण्याची सोय आहे. मणदूर-जाधववाडी येथे चांदोलीचे रिसॉर्ट आहेत. 

कसे जाल?
पुण्याहून पाटणमार्गे (जि. सातारा) जाता येते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Black Magic Ritual: महाराष्ट्र हादरला! सोळा वर्षीय मुलीवर अघोरीकृत्य, वर्षभरापासून सुरू होता प्रकार! शेवपेटीत झोपवायचा अन्...

Latest Maharashtra News Updates : पंचगंगेच्या पाणीपातळीत अर्ध्या फुटाने घट; कोल्हापुरात अद्यापही ४८ बंधारे पाण्याखाली

Vidarbha Rain: विठ्ठल पावला... विदर्भात पावसाची संततधार; यवतमाळात नदी नाल्यांना पूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, सर्वत्र पावसाचा संचा

Hinjawadi IT Park : हिंजवडीमधील समस्यांचा मुख्यमंत्री घेणार आढावा; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Basmat Crime: विदर्भातील तरुणीवर प्रेमाच्या नावाखाली अत्याचार; वसमतमधील आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT