Nepal  Esakal
टूरिझम

Travel Blog: बॅग भरो,निकल पडो; भारतापासून 4 तासाच्या अंतरावर असलेल्या देशात जायलाच पाहिजे!

आज अशा 6 आंतरराष्ट्रीय स्थळांबद्दल माहिती पाहणार आहोत कि जिथे जायला खर्चही कमी होतो आणि वेळही कमी लागतो.

सकाळ डिजिटल टीम

हनिमून, सोलो किंवा गृप ट्रिप आयुष्यात एकदा तरी परदेश दौरा करावा अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. पण खर्च आणि प्रवासासाठी जाणारा वेळ यामुळे या ट्रीप नको वाटतात. प्रवासामुळे आलेला शीण घालवण्यातच वेळ जातो.त्यामुळे कुठे फिरलो तरी आळसातच  असतो. त्यामुळे परदेशी ट्रिप आयोजित केल्या जात नाहीत.

त्यामुळेच आज अशा 6 आंतरराष्ट्रीय स्थळांबद्दल माहिती देणार आहोत कि जिथे जायला खर्चही कमी होतो आणि वेळही कमी लागतो.  काही देशात भारतातून अवघ्या 5 तासात पोहोचता येते. मुंबईतून अहमदनगरला जाजायला6तास लागतात. त्याच्याही आधी तूम्ही सिंगापूर, ओमान याठिकाणी पोहचू शकता.

दोन तासात नेपाळ - नेपाळ हा भारताच्या सर्वात जवळचा देश तर आहेच. पण परदेश दौर्‍यांसाठीही ते परवडणारे ठिकाण आहे. बर्फाच्छादित उंच शिखरे आणि हिरवीगार जंगलं नेपाळला खास बनवतात. तिथे तुम्ही विश्रांतीचे काही क्षण घालवण्यासाठी जाऊ शकता. दिल्ली एअरपोर्टवरून नेपाळ दोन तासांच्या अंतरावर आहे.

साडेतीन तासात दुबई - दुबई हे जगातील सर्वात लक्झरी शहर आहे. दुबई जगातील सर्वात लग्झरी सिटी असलेल्या लास वेगाससारखे दिसते. डेझर्ट सफारी, प्रायव्हेट आयलंड आणि मिशेलिन स्टारर्ड रेस्टॉरंट सारखा अनुभव तुम्हाला इथे घेता येईल. दिल्ली एअरपोर्टवरून अवघ्या 3 तास 35 मिनिटांत दुबईला पोहोचता येते.

चार तासात मालदीव- हनिमूनला जाणाऱ्या भारतीयांसाठी मालदीव हे सर्वाधिक पसंतीचे आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे. अलीकडेच, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मालदीवमधील ट्रीपचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. समुद्रकिनारा आणि बेटांवर रोमँटिक मुडचा आनंद लुटणाऱ्यांचे हे ठिकाण फेवरेट आहे. नवी दिल्लीहून विमानाने तुम्ही अवघ्या ४ तासात मालदीवला पोहोचू शकता.

साडेचार तासात सिंगापूर - सिंगापूरच्या बेटांचे सौंदर्य पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. एडवरेंचर लवर्स, लग्जरी सीकर्स, फोटोग्राफर्स, आर्टिस्ट आणि बॅकपॅकर्स यांना सिंगापूर फेव्हरेट डेस्टीनेशन आहे. इतर देशांच्या तुलनेत सिंगापूर भारतीयांसाठी स्वस्त आहे. दिल्ली ते सिंगापूर हा विमान प्रवास फक्त साडेचार तासांचा आहे.

साडेचार तासात सेशेल्स - सुंदर समुद्र किनारा, मनाला भिडणारे कोरल रीफ आणि निसर्गाचे अप्रतिम दृश्य सेशेल्सचे सौंदर्य सांगते. सेशेल्स हे अशा ठिकाणांपैकी एक आहे जे जगभरातील सर्वाधिक पर्यटकांना आकर्षित करते. तुम्हाला कधी इथे यायचे असेल तर सर्वात मोठ्या बेट 'मिस व्हिजिटिंग माहे' ला भेट द्यायला विसरू नका. जे इथल्या सुंदर बेटाच्या प्रवासाचे केंद्रही आहे. भारतातून विमानाने अवघ्या साडेचार तासात सेशेल्सला पोहोचता येते.

साडेतीन तासात ओमान - ओमानच्या सल्तनतमध्ये प्रत्येक पर्यटकासाठी एक आश्चर्य दडले आहे. येथील सुंदर दृश्य, फ्रेश वातावरण आणि इंटरनॅशनल रिसॉर्ट पाहून लोक ओमानला भेट देतात. ओमानला आल्यानंतर मिसफत अल अब्रयीन, जेबल हाइकिंग आणि मस्कट या गावांना भेट देण्यास विसरू नका. नवी दिल्ली येथून  मस्कतचा प्रवास केवळ साडेतीन तासांचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT