travel diaries You can stay in these places in India for free rishikesh tamil nadu  
टूरिझम

Travel Diaries: ऋषिकेश अन् हिमाचलला फिरायला जाण्याचा विचार करताय? मग, 'या' ठिकाणी फ्रीमध्ये करा तुमच्या राहण्या-खाण्याची सोय

भारतात अशी काही ठिकाण आहेत जिथे तुम्हाला अधिक पैसे खर्च करावे लागत नाहीत. अनेक ठिकाणी तुमची फ्रीमध्ये राहण्या-खाण्याची सोय होते.

सकाळ डिजिटल टीम

फिरायला आवडत नाही असा एकही व्यक्ती तुम्हाला शोधून मिळणार नाही. प्रत्येकाला प्रत्येक ऋतुत वेगवेळ्या ठिकाणी भेट द्यायला आवडत असते. काही लोकांना सोलो ट्रॅव्हलिंग आवडते, काहींना कुटुंबासोबत वेळ घालवायचा असतो, तर काहींना मित्रपरिवासोबत फिरायला आवडते.

पण सहलीचा प्लॅन्स करताना सर्वात प्रथम विचार केला जातो तो म्हणजे बजेटचा. कुठे किती खर्च येतो यांचा शोध सुरु होतो. प्रत्येकाकडे किती पैसे आहेत त्यानुसार सहलिला जाण्याची अनेक ठिकाणं निवडली जातात.

पण भारतात अशी काही ठिकाण आहेत जिथे तुम्हाला अधिक पैसे खर्च करावे लागत नाहीत. अनेक ठिकाणी तुमची फ्रीमध्ये राहण्या-खाण्याची सोय होते. तर ही ठिकाणं नेमकी आहेत तरी कोणती जाणून घेऊयात.

रामनाश्रम

तमिळनाडू हे एक ठिकाण आहे जे केवळ अध्यात्मिक सहलींसाठीच नाही तर पर्यटकांमध्ये एक सुंदर ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. तमिळनाडूच्या तिरुवन्नमलाई जिल्ह्यात शिवाचे मंदिर आहे. अन्नमलाई पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिराला अरुणाचलेश्वर शिव मंदिर असेही म्हणतात.

इथे देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक दर्शनाला येतात. तुम्ही तिरुवन्नमलाई येथे येत असाल तर तुम्ही येथे श्री रामनश्रम येथे राहू शकता, जिथे राहण्यासाठी आणि जेवणासाठी कोणतेही पैसे घेतले जात नाहीत.

ऋषिकेशला जाणार असाल तर या आश्रमात राहा

हरिद्वार आणि ऋषिकेश ही अशी ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला केवळ नैसर्गिक सौंदर्यात वेळ घालवता येत नाही तर आध्यात्मिक शांती देखील मिळते. ऋषिकेशमध्ये तुम्ही परमार्थ निकेतनमध्ये राहू शकता. येथे देखील तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. पण तुम्हाला काही सेवा कार्य करावे लागेल.

भारत हेरिटेज सर्व्हिसेस

भारत हेरिटेज सर्व्हिसेस ऋषिकेशमध्येच आहे. येथेही मोफत राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली जाऊ शकते. इथे लोकांना संस्थेप्रमाणे मोफत सेवा दिली जाते. तुम्हाला फक्त स्वयंसेवक म्हणून थोडे काम करावे लागेल. येथे आल्यावर आणि मुक्काम केल्यानंतर, तुम्ही मंदिरांना भेट देऊ शकता आणि गंगेच्या काठावर विश्रांतीचे क्षण घालवू शकता.

हिमाचलमध्ये राहण्यासाठी हे ठिकाण मोफत आहे

हिमाचल प्रदेशातील सुंदर डोंगराळ प्रदेश देखील पर्यटकांमध्ये सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. तुम्ही इथे आला असाल तर तुम्ही गुरुद्वारातील मणिकरण साहिब येथे राहू शकता. येथे खाण्यापिण्याचीही सोय आहे, त्यासाठी पैसे घेतले जात नाहीत. जर तुम्ही हिमाचलला गेलात तर तुम्ही मणिकरणला भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT