travel places to Trekking fitness spots tips tourism marathi news
travel places to Trekking fitness spots tips tourism marathi news 
टूरिझम

फ़िटनेसची परीक्षा घेणारी भारतातील 'ही' आहेत यात्रा ठिकाने

अर्चना बनगे

कोल्हापूर : ट्रेकिंग करणे म्हणजे खूप अवघड, थरारक अस आहे. असा आपला समज असतो. पण ट्रेक हा स्वत:साठी एक चॅलेंज म्हणून ही अनेकजण आजमावतात.काही जण फिटनेसाठी जात असतात. मात्र ट्रेकिंगमध्ये कधी तुमची परीक्षा होते असं वाटत का ?काही जण म्हणतील हो काही म्हणतील नाही. पण तुमच्या फिटनेसची खरी परीक्षा असते ती डोंगरात ट्रेकिंग दरम्यान. आणि जर नैसर्गिक सौंदर्य विखुरलेले असेल तर आपण आपल्या शारीरिक क्षमतेचा पूर्ण प्रयत्न करून स्वत:ला  पारखू शकता.  भारतातीमध्ये अशी काही ठिकाणे आहेत ज्याची माहिती या भागात सांगणार आहोत.

येथे मिळेल तुम्हाला एक वेगळा अनुभव
रूपकुंड, उत्तराखंड  हे अबाधित जंगले, वाहणारे छोटे-मोठे झरे असणारे एक तळ ठोकण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. पण हे ठिकाण सामूहिक स्मशानभूमीसारखे दिसते. इथल्या रहस्यमय तलावामध्ये, जे नेहमी बर्फाने गोठवलेली असते, ज्यामध्ये जवळजवळ 600 सांगाड्यांचा समावेश आहे. जे 1942 मध्ये ब्रिटीशांनी शोधले होते.  हे सांगाडे इ. स पूर्व 850 चे आहेत.  या स्केलेटन्स जवळ अंगठ्या, भाले, चामड्याचे बूट आणि बांबूचे खांब सापडले, जो तीर्थयात्रेकरूंचा ताफा होता, जो स्थानीय  लोकांच्या सहकार्याने  दरीकडे जातो.असा विश्वास असणारे अग्रगण्य तज्ञांनी सांगितले आहे. येथे आयोजित केलेल्या वार्षिक राजजात यात्रेचा मार्ग आणि ट्रेकचा मार्ग एकाच ठिकाणी  येऊन मिळतो. हा गढवली लोकांची जीवनशैली आणि प्रथा पाहण्याची एक उत्तम संधी  तुम्हाला मिळू शकते.

उंची: 16,000 फूट, 
प्रवास: 8 दिवस, 
कधी जाल: मे ते जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर, 
कठीण पातळी: मध्यम

भारतातील सर्वात लोकप्रिय असा ट्रेकिंग मार्ग जो तुम्हाला वेगळा आनंद देईल
कुद्रमुख हे दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय असा ट्रेकिंग मार्ग आहे. तुंग, भद्रा आणि नेत्रावती नद्यांव्यतिरिक्त, कादंबीच्या धबधब्याने सामावला आहे.  येथील राष्ट्रीय उद्यान त्याच्या जैवविविधतेसाठी (विविध प्रकारचे प्राणी आणि वनस्पती) प्रसिध्द आहे.पर्यावरण संरक्षणासाठी युनेस्कोने निवडलेल्या 34 साइटांपैकी ही एक आहे. कुद्रेमुखकडे 13 ट्रेकिंग मार्ग आहेत, त्यापैकी 40 किमी सर्वात कठीण ट्रॅक आहे. हे सुरक्षित वनक्षेत्र असल्याने येथे रात्री मुक्काम करण्यास मनाई आहे.

उंची: 6,214
 प्रवास: 1 दिवस 
कधी जाल: ऑक्टोबर ते मे 
अडचण पातळी: मध्यम ते कठीण

पावसाळ्यात एक आल्हाददायक अनुभव
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, उत्तराखंडही दरी 10 किमी लांबीची आहे. पावसाळ्याच्या काळात संपूर्ण दरीत सुंदर नैसर्गिक फुले उमलतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी बहरतात. येथे काही हिम तलाव आणि हिमनदी देखील आहेत.

उंची: 6,214, 
 प्रवास: 1 दिवस, 
कधी जाल: ऑक्टोबर ते मे, 
अडचण पातळी: मध्यम ते कठीण

बघा आश्चर्यकारक दृश्ये आणि भारदस्त दरी
गोयचा ला, सिक्कीम  ट्रॅकची सुरुवात सिक्कीमची पूर्व राजधानी युक्समपासून होते. हा ट्रॅक हिरव्यागार, जंगल, गवत आणि फुलांनी भरलेल्या आणि खडकाळ प्रदेशांनी भरलेला आहे . येथून आपल्याला कांचनजंगाची आश्चर्यकारक दृश्ये दिसू शकतात. गोयचा ला ट्रॅक वरुन, आपण बरीच सुंदर देखावे देखील पाहू शकता, जसे की व्हॅली ऑफ थैनसिंग आणि अनन्य बॅकहिम गाव.

उंची: 16,240, 
 प्रवास: 10 ते 15 दिवस, 
कधी जाल: जून ते ऑक्टोबर, 
अडचण पातळी: मध्यम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT