Travel Tips Sakal
टूरिझम

Travel Tips: प्रवास करताना चेहरा राहील हायड्रेट , फक्त लक्षात ठेवा 'या' गोष्टी

how to hydrated your skin during travel: प्रवास करताना तुमचा चेहरा निर्जीव दिसतो. पण चेहऱ्याची काळजी घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Skin Care Tips During Travel: प्रवास करताना बदलत्या वातावरणाचा त्वचेवर परिणाम होतो. अनेकांना टॅनिंग, खास सुटणे, पुरळ येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे प्रवासाला जाण्यापुर्वी पॅकिंग बॅगमध्ये सनस्क्रीन ठेवणे गरजेचे आहे. तसेच पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे, व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करावा आणि चेहऱ्याचा योगा करावा. या सर्व गोष्टी केल्यास प्रवासा दरम्यान तुमचा चेहरा चमकदार राहील.

व्हिटॅमिन सी

प्रवास करताना धुळ आणि प्रदुषणामुळे चेहरा निर्जीव दिसतो. यामुळे चेहऱ्याची काळजी घेणे देखील गरजेचे असते. व्हिटॅमिन सी त्वचेसाठी फायदेशीर असते. तसेच यामुळे त्वचा हायड्रेट राहते. लिंबू, संत्री यासारख्या फळांमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी असते. यामुळे प्रवासा दरम्यान फळ सोबत ठेवावे. तसेच चेहऱ्यावरचे डाग कमी होतात.

योगा करावा

प्रवासादरम्यान त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवायची असेल तर चेहऱ्याचा योगा करणे गरजेचे आहे. हाताच्या बोटांनी चेहऱ्यावर योग्य पद्धतीने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुरळित कार्य करते. यामुळे चेहरा चमकदार दिसते.

मॉइश्चराईजर

प्रवासा दरम्यान चेहरा हायड्रेट ठेवायचा असेल तर चेहऱ्यावर मॉइश्चराईजर लावावे. यासाठी चांगल्या दर्जाचे मॉइश्चराईजर वापरावे.

सनस्क्रीन वापरावे

सनस्क्रीनचा फक्त सुर्याच्या अतिनील किरणांपासूनच त्वचेचे रंक्षण करत नाही तर प्रदूषण, धुळ यापासून होणाऱ्या त्वचे संबंधित समस्येपासून दूर ठेवते. बीचवर किंवा जंगल सफारीला जाताना सनस्क्रीन लावावे.यामुळे त्वाच टॅन होणार नाही.

शरीराला हायड्रेट ठेवणारे पेय

अनेक लोक प्रवासा दरम्यान पाणी कमी पितात. कारण सारखे लघवीला जावे लागते. पण पाणी कमी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवते आणि त्याचा परिणाम चेहऱ्यावर देखील दिसून येतो. यामुळे प्रवास करताना एक एक घोट पाणी प्यावे किंवा आवळा ज्युस, ग्रीन टी यासारखे शरीराला हायड्रेट ठेवणारे पेय सोबत ठेवावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kolhapur Train : पुणे-कोल्हापूर रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! विशेष दर्जा हटल्याने तिकीट दर घटणार; 'या' तारखेपासून धावणार नव्या क्रमांकाने

Solapur Ration News: मोफत धान्य घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोलापूरमध्ये १.११ लाख रेशनकार्डधारक अपात्र; लाभ कायमचा बंद होणार

Mira-Bhayandar Metro: अनर्थ टळला! स्कूल बस पुढे गेली अन् मीरा-भाईंदर मेट्रो कामादरम्यान स्लॅब कोसळला; VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : SIR मुदतवाढीला आमचा विरोध नाही; निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम : शायना एनसी

सचिन पिळगावकरांसोबत अफेअरच्या चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं सत्य; म्हणाली- आम्ही एकमेकांना खूप...

SCROLL FOR NEXT