Travel Tips esakal
टूरिझम

Travel Tips : सोलो ट्रॅव्हलिंगला जाण्याचा विचार करताय? मग, ‘या’ चुका करणे टाळा

Travel Tips : मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या ही लागल्या आहेत. त्यामुळे, या दिवसांमध्ये फिरायला जाण्याचे खास प्लॅन्स बनवले जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Travel Tips : आजकाल तरूणाईमध्ये सोलो ट्रिपची मोठी क्रेझ पहायला मिळतेय. आता मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या ही लागल्या आहेत. त्यामुळे, या दिवसांमध्ये फिरायला जाण्याचे खास प्लॅन्स बनवले जातात. अनेकदा फॅमिली किंवा मित्र-मैत्रिणींसोबतचे प्लॅन्स बनवले जातात. परंतु, हे प्लॅन्स अचानक कॅन्सल होतात. त्यामुळे, आजकाल अनेक जण एकट्यानेच फिरायला जाणे पसंत करतात.

परंतु, सोलो ट्रिपला जाणे हे जितके भारी आहे तितकेच त्याचे व्यवस्थितपणे नियोजन देखील करावे लागते. एकट्याने प्रवास करणे हे वाटते तितके सोपे अजिबात नाही. कारण, यासाठीचे सर्व नियोजन एकट्यानेच करावे लागते आणि यामध्ये सुरक्षितता असणे फार महत्वाचे आहे.

त्यामुळे, सोले ट्रॅव्हलिंग करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. एक छोटा निष्काळजीपणा देखील मोठी समस्या निर्माण करू शकतो. आज आम्ही तुम्हाला एकट्याने प्रवास करताना काय काळजी घ्यायला हवी? आणि कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात? त्याच्या काही टिप्स सांगणार आहोत.

एकट्याने प्रवासाला जाताय याची कल्पना द्या

अनेक जण एकट्याने प्रवासाला जातोय किंवा जातेय याची पुसटशी कल्पना किंवा डिटेल्स कुणासोबतच शेअर करत नाही. ही चूक तुम्ही करू नका. तुम्ही सोलो ट्रॅव्हलिंगला कुठे आणि कसे जाणार आहात? किती दिवसांसाठी जाणार आहात? याची माहिती तुमच्या कुटुंबाला, जवळच्या व्यक्तींना नक्की द्या.

ही खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. कारण, प्रवासादरम्यान तुमची काही चूक झाली किंवा काही दुर्घटना घडली आणि तुम्ही कुठे आहात हेच घरच्यांना माहित नसेल तर ते तुमची मदत कशी करणार? त्यामुळे, तुम्ही प्रवासाला जाताय याची कल्पना घरच्यांना नक्की द्या.

मॅपसोबत ठेवा

अनेक जण प्रवासाला जाताना गुगल मॅपवर विसंबून नकाशा सोबत न ठेवण्याची चूक करतात, तुम्ही ही चुक करू नका. सोलो ट्रॅव्हलिंगला जाताना सोबत मॅप ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. आजकालचा जमाना मोबाईलमधील गुगल मॅपचा जरी असला तरी सुद्धा सोबत एखादा मॅप ठेवणे गरजेचे आहे.

जर तुम्ही जवळपासच्या एखाद्या छोट्या ठिकाणाहून एकट्याने प्रवास करायला सुरूवात केली तरी त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती तुमच्याकडे ठेवा. यासोबतच तिथे जाण्यासाठी वाहन बस, ट्रेन, जीप काय असणार याची ही आधीच माहिती काढा. जर एखादे ठिकाण तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन असेल तर त्या ठिकाणचा नकाशा अवश्य तुमच्याकडे ठेवा.

वायफायचा वापर विचार करून करा

एकट्याने प्रवास करताना तुम्ही वायफायचा वापर विचारपूर्वक करायला हवा. शक्यतो सार्वजनिक वायफायचा वापर करणे टाळा. कारण, आजच्या काळात इंटरनेट ही खूप मोठी गरज आहे. परंतु, त्यामुळे, अनेकदा आपली फसवणूक होऊ शकते.  

सुरक्षेशिवाय सार्वजनिक वायफायचा वापर करून वैयक्तिक डेटा चोरीला जाण्याची शक्यता आहे. तुमची महत्वाची माहिती लीक होऊ शकते आणि तुम्ही अडचणीत येऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी वाढ; चांदीने गाठला नवीन उच्चांक, जाणून घ्या काय आहे भाव?

Latest Marathi News Live Updates : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Viral Video: गोरिलाचा आशिक अंदाज... महिलेसोबत फ्लर्ट करत होता, प्रेयसी आली अन् त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

Supreme Court: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्या; समाजमाध्यमांच्या वापराबाबत ‘सर्वोच्च’सल्ला

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा

SCROLL FOR NEXT