Travel Tips esakal
टूरिझम

Travel Tips : "व्हिजा मिळवून देणारे देव" परदेशी जाणारे लोक या मंदिरात करतात नवस

आपल्यापैकी प्रत्येकाला परदेशवारी करायची सुप्त इच्छा

सकाळ डिजिटल टीम

Travel Tips : आपल्यापैकी प्रत्येकाला परदेशवारी करायची सुप्त इच्छा असते. पण परदेशात जायचं म्हणजे काही खायचं काम नाही. सगळी कागदपत्रं आपल्याला ओके असावी लागतात, तर आणि तरच परदेशवारी होते. पण या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला कधी कधी ६- ६ महिने वाट पाहावी लागते.

एवढं करूनही कधी कधी व्हिसा नाकारला जातो. मग एक पर्याय उरतो तो म्हणजे देवाकडे विनवण्या करणं. असं खरच असतं का? तर होय! भारतात अशी काही मंदिर आहेत जिथं जाऊन दर्शन घेतलं तरी तुमच्या व्हिसाच काम लगेच होतं.

चिलकुर बालाजी मंदिर

चिलकुर बालाजी मंदिर तेलंगणातील उस्मान समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. या मंदिराला व्हिसा बालाजी मंदिर या नावाने देखील ओळखलं जातं. असं म्हणतात की, 1980 मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचा एक ग्रुप इथे आला, त्यानंतर त्यांना लगेचच अमेरिकेचा व्हिसा मिळाला. तेव्हापासून अमेरिकेत जाणारे लोक इथे येऊन देवाचं दर्शन घेतात.

तल्हन गुरुद्वारा

पंजाबमधील जालंधर मधील या गुरुद्वाराचा इतिहास 150 वर्षांचा असल्याचे सांगितलं जातं. परदेशात जाऊ इच्छिणारे लोक या गुरुद्वारामध्ये जहाजाचे खेळणं दान करतात.

चमत्कारी व्हिसावाले हनुमान मंदिर

चमत्कारी व्हिसा असलेले हनुमान मंदिर नेब सराई, दिल्ली येथे आहे. देशभरातून येणारे लोक लाल शाईने किंवा पेनने पांढऱ्या कागदावर आपल्या इच्छा लिहितात. ज्या लोकांना व्हिसा मिळतो, ते हनुमानजींचे आभार मानण्यासाठी मंदिरात येतात.

श्री लक्ष्मी व्हिसा गणपती मंदिर

चेन्नईतील हे मंदिर अमेरिकेच्या दूतावासापासून १० किलोमीटर अंतरावर आहे. इथ येणाऱ्या लोकांच्या एका हातात पासपोर्ट आणि दुसऱ्या हातात अगरबत्ती असते. मंदिराच्या वेबसाइटवर व्हिसा मंजूर होण्यासाठी धार्मिक विधींची माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT