Travel Tips: Sakal
टूरिझम

Travel Tips: देश-विदेशात फिरणे होईल सोपे, फक्त प्रवासात घ्या 'ही' महत्त्वाची काळजी

उन्हाळ्यात देश-विदेशात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Travel Tips what to eat or what not to eat during travel

अनेक लोकांना प्रवास करायला आवडते. परंतू प्रवासादरम्यान तब्येत बिघडल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे प्रवासापुर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. ज्यामुळे तुमचा प्रवास सुखकर होईल.

तुम्ही जर देश-विदेशात प्रवास करत असाल तर खाण्या-पिण्याबाबत निष्काळजीपणा करू नका. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे प्रवासादरम्यान जेवणाची खास काळजी घ्यावी. जेणेकरून तुम्ही प्रवासाचा आनंद घेऊ शकाल.

फास्ट फूड

अनेक लोकांना फास्ट फूड खायला आवडते. पण प्रवासादरम्यान फास्ट फूड खाणे टाळावे. कारण या पदार्थांमुळे पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. याऐवजी तुम्ही प्रवासात सुकामेवा, फळं किंवा घर बनवलेले पदार्थ सोबत घेऊन जाऊ शकता.

भरपूर पाणी प्या

उन्हाळ्यात पाणी पिणे गरजेचे आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहते. प्रवासादरम्यान बद्धकोष्ठता आणि डिहायड्रेशनची समस्या कमी करण्यासाठी भरपुर पाणी प्यावे. तसेच हंगामी फळांचे सेवन करावे. यामुळे पचनसंस्थेबाबत कोणताही समस्या निर्माण होणार नाही.

वेळेवर जेवण करावे

प्रवासात खाण्या-पिण्याच्या वेळीची काळजी घ्यावी. अनेकवेळा लोक प्रवासात वेळेवर खात नाहीत, त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकते. प्रवासादरम्यान वेळेवर नाश्ता आणि जेवण करावे. यामुळे तुम्ही प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

चहा आणि कॉफीचे अतिसेवन

अनेक लोक प्रवासात चहा आणि कॉफीचे अतिसेवन करतात. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. तुम्ही प्रवासात हर्बल टी पिऊ शकता. यामुळे थकवा कमी होऊन पचनसंस्थेवर परिणाम होणार नाही. तुम्ही चहा-कॉफीऐवजी फळांचा रस पिऊ शकता.

अति खाणे टाळा

प्रवास करताना जड आणि अति पदार्थ खाणे टाळावे. प्रवासादरम्यान पौष्टिक पादर्थांचे सेवन करावे. तुम्ही आहारात दलिया, स्प्राउट्स, उकडलेले अंडी यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

IPL 2026 Auction: 'खर्च कसा करणार हा...' CSK ने बोली लावलेल्या प्रशांत वीरसाठी रिंकू सिंगसह UP संघातील खेळाडूंचा बसमध्येच जल्लोष

Mumbai News: मुंबई कोस्टल रोडसाठी 9 हजार झाडे तोडणार! बीएमसीचा मोठा निर्णय; वाचा प्रकल्पाचा सविस्तर आराखडा

Expressway Toll System : आता ‘एक्स्प्रेसवे’वर टोल भरण्यासाठी गाडी थांबवून वाट पाहण्याची गरज नसणार!

Latest Marathi News Live Update :जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली

SCROLL FOR NEXT