Hill Station Travel Packing Tips esakal
टूरिझम

Travel Packing Tips: हिल स्टेशनवर जाण्याचा विचार आहे? मग, 'या' खास गोष्टी बॅगेत ठेवा

सकाळ डिजिटल टीम

Hill Station Travel Packing Tips: जम्मू काश्मीर, शिमला, मनाली, नैनीताल ही अशी सर्व हिल स्टेशन्स आहेत, जी पर्यटकांची पहिली पसंती आहे.

देशातील अशी अनेक प्रसिद्ध शहरं आहेत, जिथं खूप उष्णता असते, त्यामुळं या शहरांतील लोकांना सुट्टीसाठी वेळोवेळी हिल स्टेशनवर जाणं आवडतं. जम्मू काश्मीर, शिमला (Shimla), मनाली, नैनीताल ही अशी सर्व हिल स्टेशन्स आहेत, जी पर्यटकांची पहिली पसंती आहे.

जर तुम्ही देखील भारतातील हिल स्टेशनला (Hill Station) फिरण्याचा किंवा भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही नेहमी काही 'खास गोष्टी' तुमच्या बॅगेत ठेवाव्यात..

जर तुम्ही भारतातील कोणत्याही हिल स्टेशनला भेट देण्यासाठी तुमची बॅग पॅक करत असाल, तर अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपण विसरतो. पण, त्या घेणं खूप गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच आवश्यक वस्तूंची यादी सांगणार आहोत, ज्या तुम्ही प्रवासादरम्यान तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये ठेवाव्यात.

लेदर जॅकेट आणि स्वेटर सोबत घ्या : हिल स्टेशनवर तापमान खूप कमी असते, त्यामुळं लेदर जॅकेट सोबत घ्या. कारण, हे जॅकेट खूप गरम असते. शिवाय, लेदर जॅकेट घालायला देखील चांगलं वाटतं. तसेच तापमान कमी असताना हे जॅकेट तुमचे शरीर उबदार ठेवते. यासोबतच जवळ स्वेटरही ठेवा.

बॉडी वॉर्मर बाळगा : बर्‍याच वेळा जास्त स्वेटर घातल्याने समस्या निर्माण होतात आणि अॅलर्जी देखील होते, त्यामुळं जेव्हा तुम्ही हिल स्टेशनवर जाल, तेव्हा नेहमी बॉडी वॉर्मर बाळगा. यासोबतच मफलर किंवा टोपी देखील जवळ ठेवा.

प्रथमोपचार किट सोबत घ्या : अनेकवेळा असं घडतं, की जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत प्रवास करता, तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणानं तुम्हाला प्रवास करताना दुखापत होते. अशा स्थितीत जेव्हाही तुम्ही सहलीला जाल, तेव्हा तुमची ट्रॅव्हल बॅग पॅक करा आणि त्यात प्रथमोपचार किटही सोबत ठेवा.

सेल्फी स्टिक आणि डिजिटल कॅमेरा घ्या : डिजिटल कॅमेरा ही अशी गोष्ट आहे, जी तुमची सहल खूप खास बनवते. दरम्यान, तुम्ही कुठेतरी प्रवासाला जात असाल, तर कॅमेरासोबतच सेल्फी स्टिक सोबत घ्यायला विसरू नका. बर्‍याच वेळा तुम्ही एकटे फिरत असता, तेव्हा सेल्फी स्किट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते.

इमर्जन्सी नंबर लक्षात ठेवा : तुम्ही जेव्हाही फिरायला जाल, तेव्हा इमर्जन्सी नंबर नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही हिल स्टेशनला जाणार असाल, तर इमर्जन्सी नंबर सोबत ठेवा, जेणेकरुन गरज पडल्यास त्याचा वापर करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT