Street Food in Lakshadweep esakal
टूरिझम

Street Food in Lakshadweep : लक्षद्वीपमध्ये फिरायला गेल्यावर 'या' अनोख्या स्ट्रीट फूड्सचा आस्वाद घ्यायला विसरू नका

मागील काही दिवसांपासून भारतातील केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप हे खूपच चर्चेत आले आहे. लक्षद्वीप हे बेट जवळपास ३६ द्वीपसमूहांनी बनलेले आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या लक्षद्वीपला भेट दिली होती, तेव्हापासूनच या बेटाची चर्चा होताना दिसत आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Street Food in Lakshadweep : मागील काही दिवसांपासून भारतातील केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप हे खूपच चर्चेत आले आहे. लक्षद्वीप हे बेट जवळपास ३६ द्वीपसमूहांनी बनलेले आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या लक्षद्वीपला भेट दिली होती, तेव्हापासूनच या बेटाची चर्चा होताना दिसत आहे.

मोदींनी या भेटीदरम्यान लक्षद्वीपमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका मारला होता. समुद्रात डुबकी मारण्यासोबतच मोदींनी स्नॉर्किंगचा आनंद लुटला होता. या दरम्यान मोदींनी खास फोटोशूट केले होते आणि याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे, या लक्षद्वीपची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.

लक्षद्वीपचे निळेशार समुद्रकिनारे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात. त्यामुळे, येथे देश-विदेशातील पर्यटकांची नेहमीच गर्दी पहायला मिळते. तुम्ही जर लक्षद्वीपला फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तेथील स्ट्रीट फूड्सचा आनंद घ्यायला विसरू नका. आज आम्ही तुम्हाला लक्षद्वीपमधील स्ट्रीट फूड्सदबद्दल सांगणार आहोत.

ऑक्टोपस फ्राय

लक्षद्वीपमधील समुद्रकिनाऱ्यांवर ऑक्टोपस मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे, येथील स्ट्रीट फूड्समध्ये ऑक्टोपसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शिवाय, येथील स्ट्रीट फूड म्हणून ‘ऑक्टोपस फ्राय’ प्रसिद्ध आहे.

ऑक्टोपस फ्राय

बेबी ऑक्टोपस फ्राय अगदी फिशफ्रायप्रमाणे तळले जातात आणि आवडीने खाल्ले देखील जातात. हे तळलेले आणि कुरकुरीत ऑक्टोपस फ्राय चवीने खाणारे देशी-विदेशी पर्यटक तुम्हाला लक्षद्पीमध्ये दिसतील. तुम्ही सुद्धा लक्षद्वीपमध्ये गेल्यावर हे स्ट्रीट फूड खायला विसरू नका.

मास पोडिचाथु

ट्यूना नावाचा मासा सर्वत्र चवीने खाल्ला जातो. या माशापासून ही खास डिश बनवली जाते. विशेष म्हणजे कोरड्या ट्यूनापासून हा मास पोडिचाथु पदार्थ बनवला जातो.

मास पोडिचाथु

या डिशला देखील येथील पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. ही डिश रोटी किंवा भातासोबत सर्व्ह केली जाते.

मुस कवाब

लक्षद्वीप या बेटावरील सर्वोत्तम सीफूड म्हणून या पदार्थाचा उल्लेख केला जातो. अनेक पर्यटकांची या सीफूडला पहिली पसंती असते. मुस कवाब या पदार्थामध्ये तेथील अनेक प्रकारच्या माशांचा वापर केला जातो.

मुस कवाब

या माशांचे तुकडे करून ते नारळाचे दूध, हळद, मिरची पावडर, धने, लवंग आणि वेलचीच्या पेस्टमध्ये मॅरिनेट केले जातात. त्यानंतर, टोमॅटो प्युरीसह हे माशांचे तुकडे शिजवले जातात. लक्षद्वीपला गेल्यानंतर हे स्ट्रीट फूड खायला अजिबात विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापूर हादरलं! 'मोक्या'तील गुन्हेगारावर अज्ञातांचा गोळीबार; रिंग रोडवर तणाव, नेमकं काय घडलं?

Double Decker Bus: पुण्यात दिसणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस! मंगळवारपासून शहरातील 'या' रस्त्यांवर धावणार

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

अमेरिकेत महागाईचा भडका! भारतीयांवर मोठी जबाबदारी; रघुराम राजन यांच्यासह या ३ व्यक्ती फेडच्या टास्क फोर्समध्ये

IND vs ENG: दुसऱ्या वनडेपूर्वी भारताला मोठा धक्का! गुरनूर ब्रारवर ICC ची कारवाई; वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT