Summer Trip Sakal
टूरिझम

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Summer Trip: तुम्हीही उन्हाळ्यात चेरापुंजीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

Puja Bonkile

visit these places while going to cherrapunji during summer days

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोक बाहेर फिरायला जाणे टाळतात. कारण कडक उन्हाचा त्यांना खुप त्रास होतो. तुम्ही अशा ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन करू शकता जे उन्हापासून दिलासा देतील. तुम्ही चेरापुंजीला ट्रिप प्लॅन करत असाल तर तेथील निसर्ग सौंदर्यांचा अनूभव घेऊ शकता. उन्हाळ्यात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मेघालयातील चेरापुंजीमधील पुढील ठिकाणांना भेट देऊ शकता.

डेनथेलेन धबधबा

चेरापुंजीमधील डेनथेलेन धबधबा हे पाहण्यासारखे सर्वोत्तम ठिकाण आहे. हे चेरापुंजी मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. यामध्ये नैसर्गिक खडक कोरलेल्या 'थॅलेन' किंवा ड्रॅगनची कथा सांगतात. ज्याला धबधब्याच्या शिखरावर मारले गेले होते. हे चेरापुंजीतील सर्वोत्तम ऑफबीट ठिकाणांपैकी एक आहे. तुम्ही येथे सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी, फोटो काढण्यासाठी भेट देऊ शकता.

नोहकालिकाई धबधबा

जर तुम्ही उन्हाळ्यात मेघालयला जाण्याचा प्लॅन करत असाल तर नोहकालिकाई धबधब्याला भेट देऊ शकता. हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे आणि चेरापुंजीत भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. हा धबधबा एकाच वेळी 1,115 फूट उंचीवरून कोसळतो. तसेच हिरवीगार जंगले या धबधब्याचे सौंदर्य अनेक पटींनी वाढवतात. येथे तुम्ही ट्रेकिंग, कॅम्पिंग, पोहणे आणि फोटोग्राफीचा आनंद घेऊ शकता.

इको पार्क

तुम्ही मेघालयातील इको पार्कला भेट देऊ शकता. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आणि फिरण्याचा आनंद घेऊ शकता.

मावसमाई गुफा

मावसमाई गुहा ही एक चुनखडीची गुफा आहे. जी तुम्हाला भूगर्भातील अतिशय रोमांचकारी अनुभव देतात. तुम्ही येथे स्टॅलेक्टाईट आणि स्टॅलेग्माइट फॉर्मेशन्स एक्सप्लोर करू शकता. गुफेमध्ये त्रासाशिवाय फिरू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

मॉकड्रिलवेळी हातात फुटलं ग्रेनेड, ४ पोलीस गंभीर जखमी; अहिल्यानगरमध्ये दुर्घटना

जास्त भावुक नका होऊ! कॉकरोच जनता पार्टीविरोधात याचिका, सरन्यायाधीश काय म्हणाले?

Mahabaleshwar Traffic Jam : महाबळेश्वरला जाताय तर सावधान! पोलिसांच्या 'या' अजब कारभारामुळे पर्यटक हैराण; चक्क स्थानिक नेत्यांनीच हातात घेतला विषय

Share Market: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे शेअर बाजारातील या 3 शेअरमध्ये मोठी तेजी!

SCROLL FOR NEXT