Bird  esakal
टूरिझम

World Tourism Day: पक्षी निरीक्षणामुळे पर्यटनवाढीला फायदा

अरविंद मोटे

शहरात आणि शहरापासून हाकेच्या अंतरावर देशी व विदेशी पक्ष्यांचे सहज दर्शन होते.

सोलापूर: जिल्ह्यातील पर्यटनवाढीला पक्षी निरीक्षणाचा फायदा होणार असून, हिप्परगा तलाव व धर्मवीर संभाजी तलावाच्या सुशोभिकरणामुळे शहराच्या सौदर्यांत भर पडणार आहे.

राज्यभरातील पक्षी अभ्यासकांना पक्षी निरीक्षणासाठी शहर सोडून दूर जंगलात जावे लागते. मात्र, सोलापूरकर हे भाग्यवान आहेत की येथे शहरात आणि शहरापासून हाकेच्या अंतरावर देशी व विदेशी पक्ष्यांचे सहज दर्शन होते. सोलापूर जिल्ह्यात 357 प्रकारचे विविध पक्षी परेदशातून स्थलांतर करतात. परदेशातून साधारपणे ऑक्‍टोबर ते जानेवारी या कालावधती अनेक पक्षी सोलापूर जिल्ह्यात स्थलांतर करतात. याशिवाय अनेक दुर्मिळ पक्षी जिल्ह्यात कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. हिप्परगा हे सोलापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावरील ठिकाण असून हिप्परगा तलाव परिसराचा योग्य विकास केल्यास याठिकाणी राज्यभरातील पक्षीप्रेमी व अभ्यासक पक्षी निरीक्षणासाठी येतील. याशिवाय शहरात धर्मवीर संभाजी तलाव, सिद्धेश्‍वर तलाव, होटगी तलाव आदी जलाशयांवर विविध पक्ष्यांचा नेहमी वावर असतो.

हिप्परगा व धर्मवीर संभाजी तलावात आढळणारे पक्षी

पेन्टेड स्टॉर्क (चित्रबलाक), एशियन ओपनबील (मुग्धबलाक), व्हाईट नेक्‌ड स्टॉर्क (कांडेसर), लिटील ग्रेब (टिबुकली), ओरिएन्टल डार्टर (तिरंदाज), काळा बगळा, जांभळा करकोचा, व्हाईट स्टॉर्क (पांढरा करकोचा), ग्रेटर फ्लेमिंगो (रोहित), लेसर फ्लेमिंगो (छोटा रोहित), लेसर व्हिसलिंग डक (मराल), ग्रेलॅग गुज (शामकादंब), ब्राह्मणी शेल्डक (चक्रवाक), बार हेडेड गुज (पट्टकादंब), कॉम्ब डक (नकटा), इंडियन सॉफ्ट बिल्ड डक (हळदी कुंकू), नॉर्दन शोव्हेलर (थापट्या), कॉमन टील (चक्रांग), रेड क्रेस्टेड पोकार्ड (तुरेवाला चारी), व्हाइट ब्रेस्टेड वॉटरहेन (लाजरी पाणकोंबडी), ब्राउन क्रेक (तपकिरी फटाकडी), पर्पल स्वॅम्पहेन (जांभळी पाणकोंबडी), कुट (वारकरी).

हिप्परगा तलाव हे पक्ष्यांचे माहेरघर आहे. ब्रिटीशकाळापासून येथे पक्ष्यांचा वावर आहे. अनेक प्रकारचे पक्षी येथे स्थलांतर करतात. हिप्परगा तलाव आणि धर्मवीर संभाजी तलावच्या सुशोभिकरणाबरोबर पक्षी निरीक्षकांसाठी योग्य सुविधा केल्यास हे उत्कृष्ट पर्यटनक्षेत्र म्हणून उदयास येईल.

- डॉ. व्यंकटेश मेतन, पक्षीप्रेमी

धर्मवीर छत्रपती संभाजी तलावात पूर्वीपासून अनेक दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन होते. या तलावात येणारे दूषित पाणी व सभोवताचे अतिक्रमण रोखणे आवश्‍यक आहे. स्मृतीवनाच्या बाजूने पक्षी निरीक्षणास मोठी संधी आहे. या तलावाच्या सुशोभिकरणाबरोबरच योग्य सुविधा उपलब्ध होण्याची आवश्‍यकता आहे.

- अजित चव्हाण, निसर्गप्रेमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

तेजश्री प्रधानला रिप्लेस करणारी अभिनेत्री होणार आई; समुद्रकिनारी फोटोशूट करत दाखवला बेबी बंप, तुम्ही ओळखलंत का?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

SCROLL FOR NEXT