sinhgad fort
sinhgad fort sakal
टूरिझम

World Tourism Day: बॅग पॅक करा अन् चला भटकंतीला

दीनानाथ परब

कामाच्या व्यापामुळे किंवा तणावामुळे एखादी व्यक्ती कंटाळली असेल, निराश असेल, त्याच्यात उत्साह नसेल, अशा वेळी त्या माणसाला 'चल कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ असं कोणी म्हटलं', तर आपसूकच त्या व्यक्तीच्या मनात फ्रेशनेसची एक भावना येते, त्याला थोडासा उत्साह वाटतो. आपण लांब कुठे, किंवा एखाद्या पर्यटन स्थळी त्या व्यक्तीला घेऊन जाणार नसतो. मुंबईत असलो, तर एखाद्या बीचवर किंवा गावी असलो, तर जास्तीत जास्त एखाद्या डोंगर माथ्यावर जातो. पण समोरचं डोळ्याला सुखावणारं निसर्गाच सुखद चित्र बघून मनात प्रसन्नतेची भावना येते.

सध्याच्या धकाधकीच्या, तणावाच्या जगात म्हणूनच पर्यटन जगण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पर्यटनामुळे मन प्रसन्न होतचं पण स्वत:मध्ये एक ऊर्जा, उत्साह निर्माण होतो. गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. म्हणूनच आयुष्यात फिरणं, भटकंती खूप महत्त्वाची आहे. मागच्या दशकभरात भारतातील पर्यटन क्षेत्र पूर्णपणे बदलून गेलं आहे. आज पर्यटन हे रोजगार देणारं क्षेत्र असून अनेक तरुण मुलं त्या मध्ये आपल करीयर शोधत आहेत. जशा पर्यटन कंपन्यांचा विस्तार झालाय, तसे पर्यटनाचे शिक्षण देणारे कोर्सेसही आलेत. १५-२० वर्षापूर्वी अशी स्थिती नव्हती.

लग्नानंतर नवविवाहित जोडपं चार दिवस कुठेतरी फिरायला अर्थातच हनिमूनसाठी बाहेर जायचं. तेच त्यांचं पर्यटन असायचं. त्या व्यतिरिक्त गावी किंवा जास्तीत जास्त तीर्थक्षेत्राची सफर केली जायची. पण १९९१ सालच्या आर्थिक उदारीकरणानंतर खासगी क्षेत्रासाठी आकाश मोकळं झालं आणि मध्यम वर्गाच्या हातात बऱ्यापैकी पैसा आला. आता पर्यटन हनिमूनपुरताच मर्यादीत राहिलेलं नाही, अनेक मध्यमवर्गीय कुटुंब, मित्र परिवार हे देशातंर्गत सहलींबरोबर परदेशी टुर्सचे प्लान आखतात. पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार आहेत.

जंगलसफारी, ग्रामीण पर्यटन, क्रूझ टुरिझम, तीर्थक्षेत्र, साहसी खेळ असे पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक कुटुंब, व्यक्ती आपल्या आवडीनुसार पर्यटनाचा प्रकार निवडते. खरंतर फेब्रुवारी २०२० पर्यंत भारतात पर्यटन क्षेत्रात सर्व काही व्यवस्थित, सुरळीत सुरु होतं. पण मार्च महिन्यात कोरोनारुपी राक्षसाने उग्र रुप धारण केलं आणि सर्व काही बदलून गेलं. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन लावावा लागला. त्याचा फटका मोठ्या उद्योजकापासून ते पानाची टपरी चालवणाऱ्यालाही बसला. त्यामुळे पर्यटन क्षेत्र यातून सुटण्याची शक्यता नव्हती. खरंतर कोरोनामुळे सर्वात जास्त वाताहत या पर्यटन क्षेत्राची झाली.

कारण तिकीट बुकिंग, ज्या ठिकाणी जायचय त्या पर्यटन स्थळाची माहिती, जास्तीत जास्त ऑनलाइन दिली जाऊ शकते. त्या व्यतिरिक्त इथे काहीच ऑनलाइन होऊ शकत नाही. माणसाला प्रत्यक्ष तिथे जाव लागणार आहे. त्यामुळे मागच्या दीडवर्षात पर्यटन क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. मागच्यावर्षीच्या नॅशनल काऊन्सिल ऑफ अप्लाईड इकोनॉमिक रिसर्सच्या आकडेवारीनुसार भारतात पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या १ कोटी पेक्षा जास्त लोकांचे रोजगार बुडाले. नामांकित पर्यटन कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या युवक-युवतीना कामावरुन कमी केलच. पण त्याचबरोबर तिकीट बुकिंगपासून ते गाईडपर्यंत सर्वांचच आर्थिक नुकसान झालं.

एखाद्या रिसॉर्टच्या साध्या उदहारणावरुन आपल्या लक्षात येईल. माथेरान-कर्जतच्या रिसॉर्टमध्ये लोक एक-दोन दिवसाच्या पिकनिकला जातात. लोक जेव्हा तिथे जातात, तेव्हा त्या गावातल्या लोकांना रिसॉर्टमध्ये जेवण बनवण्यासाठी, स्वच्छतेसाठी बोलावलं जातं. त्यातून त्यांना चार पैसे सुटतात. पण लॉकडाउनमुळे या सगळ्यांच बरचं नुकसान झालं आहे. आता पुन्हा एकदा वर्तमानपत्रात पर्यटनाच्या जाहीराती दिसू लागल्या असून हे क्षेत्र थोडफार सावरतान दिसतयं. लसीकरण आणि कोविड नियमांचं पालन व्यवस्थित सुरु राहिलं, तर पर्यटन क्षेत्रात लवकरच जुने दिवस परत येतील. आता तिसऱ्या लाटेचा धोका कमी झालाय. त्यामुळे मस्त बॅग पॅक करुन तुम्ही आवडत्या पर्यटनस्थळी जाण्याचा प्लान करु शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT