A 5-year-old child from the US went viral after ordering items worth ₹2.5 lakh on Amazon while parents were asleep, raising concerns over child safety and online shopping controls.  esakal
Trending News

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

5-year-old child online shopping on Amazon: जाणून घ्या, त्या चिमुकल्यानं अमेझॉनवरून नेमकी काय खरेदी केली,वाचून तुम्हीही थक्क व्हाल अन् त्याच्या आई-वडिलांना जेव्हा जाग आली तेव्हा मग त्यांनी काय केलं?

Mayur Ratnaparkhe

How a 5-Year-Old Ordered Items Worth 2.5 Lakh on Amazon: आजकाल आई-वडील लहान मुलांच्या हाती बिनधास्त मोबाइल देतात, ज्याचे अनेकदा विपरीत परिणामही दिसून आले आहेत. तर मुलांमध्येही मोबाइलचे आकार्षण वाढत आहे. यातूनच आता लहानमुलांकडून मोबाइलाचा अनावश्यकरित्या वापर होवू लागला आहे.

असाच काहीसा प्रकार अमेरिकेत समोर आला आहे. जिथे एका दाम्पत्याने आपल्या पाच वर्षांच्या मुलाच्या हाती मोबाइल सोपवून फार मोठी चूक केली. या चिमुकल्याने त्याचे आई-बाबा झोपल्यावर चक्क अमेझॉनवरून तब्बल अडीच लाखांची खरेदी केली. झोपेतून उठल्यानंतर जेव्हा त्याच्या आई-बाबांना घडलेला प्रकार लक्षात आला, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, मुलाचे आई-वडील जेव्हा त्यांची अमेझॉन ऑर्डर हिस्ट्री बघत होते, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच घसरली. कारण, त्यांच्या लाडक्याने त्यांच्या माघारीच अमेझॉनवरून तब्बल अडीच लाख रुपयांची खरेदी करून टाकली होती. विशेष म्हणजे या चिमुकल्याने त्याच्यासाठी सर्व खेळणीच ऑर्डर केली होती.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यात आई-वडील आपल्या मुलाला प्रश्न विचारताना दिसत आहेत. तर मुलगा निर्विकारपणे आपल्या भाऊ आणि बहिणीच्या मध्ये सोफ्यावर बसलेला आहे. वडील विचारताय तू अमेझॉनवर सात कार खरेदी केल्यात. तू आज अमेझॉनवर ३ हजार डॉलरपेक्षाही जास्त खरेदी केली आहे. तू असं कसं काय केलंस?, तू मोठा घोळ घालून ठेवला आहेस.

जाणून घ्या, मुलानं काय-काय खरेदी केली? –

मुलाने ऑर्डर केलेली यादी, एखाद्या सांताच्या क्रिसमस लिस्टसारखीच दिसत होती. यादीत एक लहान मुलांच्या खेळणीतील कार, एक बाइक आणि काही गेमिंगचं सामान होतं. मात्र गोष्ट इथंच संपत नाही, त्यांच्या कार्टमध्ये जवळपास आणखी ६० हजार रुपयांच्या सामानाची ऑर्डर दिसत होती. नशीब तितक्यात त्याच्या आई-वडिलांना जाग आली आणि त्यांनी मोबाइल घेतला. नाहीत आणखी साठ हजारांचा फटका त्यांना बसला असता.

व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, आणि आम्ही पकडण्याच्या आधी त्याच्या कार्टमध्ये ७०० डॉलरचं सामान चेकआउटसाठी तयार होतं. सध्या मी अमेझॉनला कॉल करून रडत आहे आणि माझे पती बँकेत फोन करून रडत आहेत. ही पहिली घटना नाही, जेव्हा एखाद्या लहान मुलाने एवढी मोठी शॉपिंग केली. याआधीही एका लहान मुलीने अमेझॉनवरून तब्बल तीन लाखांपेक्षाही अधिकची शॉपिंग केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: फलटणला सर्वात आधुनिक शहर बनवू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; टीकाटिप्पणीपेक्षा विकास हा माझा अजेंडा!

ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये गोड ट्विस्ट! 5 मिनिटांत घरच्या घरी बनवा विना अंड्याची Brownie, लगेच ट्राय करा

Marathi Career Rashi Bhavishya: आजचा दिवस भाग्यवान! सूर्य–मंगळ संयोगामुळे 'या' राशींना मिळणार करिअर आणि आर्थिक फायदा

अग्रलेख - सरकारी माणिकशोभा!

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

SCROLL FOR NEXT