56 old security guard jabalpur rajkaran baraua gets msc mathematics degree after 24 attempts Esakal
Trending News

पप्पू पास हो गया! २४ वेळा नापास, अखेर वयाच्या ५६व्या वर्षी मिळवली MScची डिग्री

पप्पू पास हो गया! २४ वेळा नापास, अखेर वयाच्या ५६व्या वर्षी मिळवली MScची डिग्री

रोहित कणसे

मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एखादी व्यक्ती अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू शकते. जबलपूरयेथील रहिवासी असलेल्या ५६ वर्षीय राजकरण बरौआ यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. राजकरण यांच्याकडे आज घर, कायमस्वरुपी नोकरी, कुटुंब नसले तरी आता ते अभिमानाने, 'माझ्याकडे गणितात एमएस्सीची पदवी आहे'असं सांगू शकतात. विशेष म्हणजे हे साध्य करण्यासाठी त्यांना दोन-चार-पाच वर्षे नव्हे तर जवळपास २५ वर्षे लागली.

गणितविषयात मास्टर डिग्री मिळवण्याच्या प्रयत्नात राजकरणयांनी जवळपास अर्धे आयुष्य व्यतीत केले. ते २३ वेळा नापास झाले, पण सुरक्षारक्षक म्हणून डबल शिफ्ट आणि अनेक अडचणी असूनही त्यांनी आपलं स्वप्न जिवंत ठेवलं आणि अखेर २०२१ मध्ये उत्तीर्ण झाले.

राजकरण यांचं गणितावर इतकं प्रेम होतं की त्यांनी अद्याप लग्न देखील केलं नाहीये. त्यांनी सांगितलं की माझं लग्न माझ्या स्वप्नाशी झाला होतं. गणित विषयात एमएमसीची डिग्री मिळवण्यासाठी झपाटलेल्या राजकरण यांनी सांगितलं की १९९६ मध्ये एमए केल्यानंतर मी कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. मी ज्या प्दधतीने विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवला त्याची शिक्षकांकडून कौतूक झालं यानंतर माझ्या मनात गणित विषयात एमएससी करण्याचा विचार आला.

तेव्हा तुमच्याकडे ऑप्शनल विषय घेऊन एमएससी करण्याचा पर्याय होता, त्यांना सांगितलं की मी १९९६ मध्ये जबलपूर येथे राणी दुर्गावती महाविद्यालयातून एमएससी करण्यासाठी अर्ज केला होता आणि तो स्वीकारण्यात देखील आला. तेव्हा हे किती अवघड आहे हे त्यांना माहिती नव्हते. त्यांना एमएससी पूर्ण करण्यासाठी तब्बल २५ वर्ष मेहनत घ्यावी लागली.

राजकरण यांनी सांगितलं की, १९९७ मध्ये मी पहिल्यांदा एमएससी परीक्षेला बसलो आणि फेल झालो. पुढील १० वर्, मी पाच विषयांपैकी फक्त एकाच विषयात पास होऊ शकलो. पण मी पराभव स्वीकारला नाही. मी लोक काय म्हणतील याचा विचार केला नाही आणि मी आरले काम आणि ध्येयावर लक्ष केंद्रित केलं. यानंतर मी दोन विषयात पास होत गेलो. शेवटी २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे मी आपली पहिल्या वर्षाची परीक्षा पास केली आणि २०२१ मध्ये मी दुसऱ्या वर्षीच्या परीक्षी देखील पास केल्या. मी खूप आनंदी होतो. त्यांनी सांगितलं का प्रयत्न आणि संयमासोबत तुम्हा हवे ते मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT