Trending News sakal
Trending News

Success Story: 9-5 जॉब करुन आयुष्य वाया घालवताय म्हणणारा तो वयाच्या 23व्या वर्षी करोडपती

हा मुलगा वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी करोडपती झाला आहे.

Aishwarya Musale

आपल्या मेहनत आणि धाडसाच्या जोरावर वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी करोडपती बनलेल्या एका मुलाने दावा केला आहे की जे लोक 9 ते 5 जॉब करतात ते आपले आयुष्य वाया घालवतात. कॅम मोअर असे या मुलाचे नाव आहे.

त्याने नोकरी सोडली होती. आता तो इतरांनाही नोकरी न करण्याचा सल्ला देतो. कॅम खूप चांगले जीवन जगत आहे. त्याने ई-कॉमर्स व्यवसाय सुरू केला. जे वेगाने प्रगती करत आहे.

एका रिपोर्टनुसार, कॅम दक्षिण ऑस्ट्रेलियात राहतो. ते आता सुट्टी साजरी करत आहे. असे जीवन कोणीही मिळवू शकतो असे तो म्हणत आहे. कॅमने कारपेंटर म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली, परंतु प्रशिक्षण संपण्याच्या सहा महिन्यांपूर्वी त्याने हे काम सोडले. तो म्हणतो की तो 12-तासांच्या शिफ्टमध्ये, आठवड्यातून पाच दिवस, थोड्या पैशासाठी 'त्याची पाठ मोडून' काम करून थकला होता.

कॅम व्यवसायातून करोडोंची कमाई करतो

कॅमने 2020 मध्ये आपले करिअर सोडले आणि ई-कॉमर्स उद्योगात काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न पाहिले. हे करून त्याने मोठी रिस्क घेतली होती. आता तो दरमहा २ कोटींहून अधिक कमावतो. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने सांगितले की, जेव्हा पैसे येऊ लागले तेव्हा त्याचे भान हरपले.

कॅमने सांगितले की, 'अर्थात, यात रिस्क होती कारण मी स्वतः सर्वकाही केले आहे आणि मला वाटते की हीच गोष्ट लोकांना सर्वात जास्त घाबरवते. असे लोक विचार न करता आपले आयुष्य वाया घालवतात असे माझे मत आहे.'

तो म्हणाला, 'लोकांना सांगितले जाते की तुम्हाला आयुष्यात फक्त शाळेत जावे लागेल, मग पदवी घ्या किंवा व्यवसाय करा, घर विकत घ्या. मी काही काळ त्या मानसिकतेचे पालन केले, पण एकदा मला समजले की मी स्वतःसाठी किती पैसे कमवू शकतो, मी मागे वळून पाहिले नाही.'

आता कॅम त्याला हवे तसे जीवन जगत आहे. यासोबतच लोकांना त्यांच्या कंपनी सिक्स फिगर ड्रॉप शिपरद्वारे ई-कॉमर्स उद्योगाविषयी माहिती देत आहे. 2020 मध्ये त्याचा ब्रँड लॉन्च झाल्यापासून त्याने 2500 हून अधिक लोकांना प्रशिक्षण दिले आहे.

भविष्यातही तो असेच सुरू ठेवणार असल्याचे कॅमचे म्हणणे आहे. तो शक्य तितके लोकांचे डोळे उघडेल. तो म्हणाला, 9-5 जॉब करणाऱ्या लोकांचे आयुष्य वाया जाते, हे काम करण्याऐवजी ते त्यांच्या आयुष्यात काय करू शकतात हे पहावे अशी माझी इच्छा आहे.'

करोडपती झाल्यानंतर कॅम 6.46 कोटींच्या घरात राहत आहे. त्याने BMW M5 कार खरेदी केली आहे. तसेच सुट्टी साजरी करतो. तो म्हणाला की त्याला कारपेंटरचे काम आवडते, पण ही नोकरी लवकरच इतर नोकऱ्यांप्रमाणे कंटाळवाणी वाटू लागली. 'आता प्रत्येक दिवस खरोखर वेगळा आहे आणि मी माझ्या नशिबाचा मास्टर आहे,' असे तो म्हणतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT