Viral Love Story esakal
Trending News

Viral Love Story: तरुणाने केला आज्जीबाईंशी साखरपुडा, दहा वर्षांचा असतानाच झालेलं वेडं प्रेम

थायलंडच्या एक आजीचं तिच्यापेक्षा ३७ वर्ष लहान असलेल्या मुलावर प्रेम जडलं

सकाळ डिजिटल टीम

Viral News: प्रेमात लोक वेडे असतात असे बरेचदा आपण ऐकतो. डिजीटल माध्यमांच्या जगात बऱ्याच जोडप्यांच्या लव स्टोरीज व्हायरल होतात. वयात बरंच अंतर असल्यानेही बऱ्याच जोडप्यांच्या लव स्टोरीज हल्ली व्हायरल होतात. अशीच एका जोडप्याची लव स्टोरी जगभऱ्यात व्हायरल झाली आहे. थायलंडच्या एक आजीचं तिच्यापेक्षा ३७ वर्ष लहान असलेल्या मुलावर प्रेम जडलं. एवढंच नाही या जोडप्याने साखरपुडा देखील केला.

नुकताच साखरपुडा झालेल्या ५६ वर्षीय आजीचं १९ वर्षाच्या मुलासह ९ वर्षांपासून अफेअर सुरू होतं. या आजींचं नाव जनला नामुआंगराक असून या आजी या तरूणाला पहिल्यांदा तेव्हा भेटल्या होत्या जेव्हा हा तरूण अवघ्या दहा वर्षांचा होता. हे दोघे एकमेकांचे शेजारी आहेत. या दोघांमध्ये तब्बल ३७ वर्षांचं अंतर आहे. मात्र प्रेमात वेड्या या जोडप्याने वयाच्या सगळ्या सिमा ओलांडत एकमेकांशी साखरपुडा केला. त्यांच्या राहत्या ठिकाणच्या आजूबाजूला त्यांच्याबाबत अनेक चर्चाही रंगल्या मात्र प्रेमात वेड्या या जोडप्याला जगाची पर्वा नाहीच. ते दोघेही एकमेकांबरोबर खुश आहेत. (Viral News)

१९ वर्षीय तरूण वुथिचाई मागल्या दोन वर्षापासून या महिलेसोबतच राहातोय. या दोघांमध्ये वयाचं एवढं मोठं अंतर असल्याची कुठलीही चिंता दिसत नाही. एकमेकांना हे जोडपं समजून घेत भरपूर वेळ सोबत असतात. बाहेर सोबत जातानाही आम्ही कसलीच लाजही बाळगत नसल्याचे हे जोडपं म्हणालं.

महिलेला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून आहेत तीन मुले

जनला या महिलेचा घटस्फोट झाला असून तिच्या तिन्ही मुलांचे वय २०-३० वर्षादरम्यान आहे. या महिलेसाठी तरूण मुलगा एक सुपरमॅनसारखा असल्याचेही ती सांगते. लवकरच हे जोडपं लग्न करण्याचंही नियोजन करतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT