Video Viral  Sakal
Trending News

Video Viral : 'गदा चोर... गदा कोणी चोरली आणून द्या'; बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला पण बक्षिसांच्या 12 गदा चोरीला

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील खरड गावात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या नावे आमदार केसरी बैलगाडा शर्यत भरविण्यात आली होती. बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला पण तो थोडा उशीराने. शर्यत उशीर झाल्याने स्पर्धेच्या ठिकाणी अंधार पडला. आणि या अंधाराचा फायदा घेत थेट मंचावरुन चोरट्यांनी आपला हात साफ करत तब्बल दहा ते बारा गदा चोरुन नेल्या.

पोलिस बंदोबस्त, आयोजकांची उपस्थितीत ही चोरी घडल्याने आयोजकांनी मंचावरून गदा चोर...ज्यांनी कोणी गदा चोरली असेल परत आणून द्या असे आवाहन करण्यास सुरुवात केली. याचा व्हिडीओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींचा धुरळा रोज कोठे ना कोठे उडत आहे. मलंगगड परिसरात खरड गावात कल्याण पूर्वेचे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नावे आमदार केसरी स्पर्धेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. काकडवाल गावातील निलेश कान्हा पावशे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

ही स्पर्धा सुरु होण्यास काहीसा उशीर झाल्याने रात्री उशिरापर्यंत स्पर्धा सुरु होती. रात्रीचा अंधार पडल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला असून थेट मंचावरून बक्षिसांच्या रुपात ठेवलेली गदाच या चोरट्यांनी चोरुन नेली आहे. स्पर्धेच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त, आयोजक, कार्यकर्ते यांची उपस्थिती असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बक्षीस वितरणाच्या दरम्यान गदा चोरीला गेल्याची माहिती समोर आली. यानंतर आयोजकांनी गदा चोर म्हणत, ज्यांनी कोणी गदा चोरली ती परत आणून द्या असे आवाहन करण्यास सुरुवात केली. मात्र चोरटयांनी चोरलेल्या गदा परत केलेली नाही. याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बैलगाडा शर्यतीच्या मंचावरून दहा ते बारा गदा चोरीला गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र या बाबत अद्याप हिललाईन पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT