aap arvind kejriwal telangana viral video bjp manoj tiwari takes a jibe  
Trending News

Viral Video : 'गजब बेइज्जती है यार'; केजरीवालांनी भर सभेत प्रश्न विचारला पण पब्लिक…

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीच्या (BRS) कार्यक्रमात भाषण करत होते. यावेळे केजरीवाल यांनी जनतेला संबोधित करताना नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या भाषणातील एक क्लीप सध्या व्हायरल होत असून यामध्ये अरविंद केजरीवाल यांचं हसू झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडीओ शेअर करत भाजपकडून देखील केजरीवालांनवर निशाणा साधला जात आहे. (arvind kejriwal telangana viral video)

केजरीवाल यांच्या या भाषणाचा व्हिडिओ शेअर करताना भाजप खासदार मनोज तिवारी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. यावर सोशल मीडिया यूजर्सनीही देखील अनेक कमेंट्स केल्या आहेत.

केजरीवाल काय म्हणाले..

भाषणादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल समोर बलेलेल्या जनसमुदायाला म्हणाले की, तुमच्यापैकी कोण-कोण बेरोजगार आहे? हात वर करून मला सांगा, जे इथे बेरोजगार आहेत, हात वर करा. केजरीवालांच्या बोलण्यावर बसलेल्या हजारो लोकांपैकी कोणीही हात वर केला नाही. त्यानंतर लगेच केजरीवालांनी सांभाळून घेत, मला वाटते लोकांना माझी भाषा समजत नाहीये, नाहीतर बरेच बेरोजगार आहेत.

मनोज तिवारींनी साधला निशाणा

भाजप खासदा मनोज तिवारी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करताना त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून लिहिले की, “विधानसभेत उद्धटपणाची भाषा. आप सरकारमधील भ्रष्टाचाराची भाषा, तर इथे तेलंगणात खोटेपणाची भाषा. तेलंगणातील जनतेने तुम्हाला आरसा दाखवला. त्यामुळे एकही हात वर केला गेला नाही.

तेलंगणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (BRS) ची एक भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल , पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा (डी. राजा) सामील झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Wildlife: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! अंबा नदीत आढळला परदेशी व दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार' मासा; रायगडमध्ये दुर्मिळ परदेशी माशाचा शोध

सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी' मधलं 'सुपरनोव्हा' गाणं प्रदर्शित; पण सुपरनोव्हा म्हणजे काय?

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! पत्नीशी वादानंतर पतीने घर पेटवले; तीन पाळीव मांजरांचा मृत्यू

Kinwat Forest Department: किनवट वन विभागाला हायकोर्टाचा झटका; RTI माहिती न दिल्याप्रकरणी अधिकाऱ्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT