Viral Video Sakal
Trending News

Viral Video : हे समाधान विकत नाही मिळत! पेन विकणाऱ्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर उमटलं हसू

सकाळ डिजिटल टीम

आपण शहरात रस्त्याने प्रवास करताना अनेक वेळा सिग्नलवर काही मुले पेन किंवा कचऱ्याच्या पिशव्या विकताना पाहिले असतील. तर अनेकदा ध्वज किंवा बदलत्या सणांनुसार वस्तूंची विक्री रस्त्यावरील अनेक कुटुंबांकडून केली जाते. तर लहान मुलांनाही या गरीबिचा शिकार व्हावं लागतं.

हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

अफगाणिस्तानमधील असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी आपल्या कुटुंबाला आधार म्हणून रस्त्यावर पेन विकत असते. तर एका महिलेने तिच्याकडील सर्व पेन विकत घेऊन तिला जास्तीचे पैसे दिले आहेत. त्यामुळे ती खूश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.

झैनाब असं या मुलीचं नाव आहे. महिला तिला सगळे पेन घेण्याबद्दल बोलते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. तर त्यानंतर कारमधील महिलेने सदर मुलीकडील सर्व पेन खरेदी केले आहेत. पेन खरेदी केल्यानंतर मुलगी खूश होऊन आपल्या आईकडे पळत जाताना व्हिडिओत दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं समाधान या महिलेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT