Viral Video Sakal
Trending News

Viral Video : बहिणीने केलं आंतरजातीय लग्न; भावाने सर्वांसमोर गाडीवरून फिल्मी स्टाईलने उचलून नेलं

बहीण आरडाओरड करत असतानासुद्धा भावाने तिला सर्वांसमोर गाडीवरून उचलून नेलं

सकाळ डिजिटल टीम

पटना : मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या भावाने तिला सासरच्या घरातून बाहेर ओढत गाडीवरून सर्वांच्या समोर उचलून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना बिहारमधील सीमावर्ती जिल्हा असलेल्या अररियाच्या बथनाहा भागातील भंगाही येथील श्यामनगरमध्ये घडली आहे.

अधिक माहितीनुसार, मंडल जातीच्या मुलीचे नाई जातीच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. यातूनच पुढे त्यांनी विवाह केला होता. त्यांच्या हा विवाह कुटुंबियांना मान्य नव्हता. लग्नाच्या आधीसुद्धा सदर मुलाला मारण्याची धमकी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

तर लग्न केल्यानंतर मुलीचा भाऊ आणि नातेवाईकांनी तिला सर्वांसमोर घरातून बाहेर ओढले आणि गाडीवरून उचलून नेले. यावेळी ती मोठ्याने ओरडत असताना जळपास १०० लोकं पाहात होते पण एकानेही हा प्रकार रोखण्याचं धाडस केलं नाही. रागात असलेल्या नातेवाईकांनी फिल्मी स्टाईलने तिला उचलून नेलं आहे.

ही घटना शनिवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर तरूणीच्या सासरच्या मंडळींकडून तिच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली असून यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT