A woman caught in Ahmedabad after throwing chili powder into a jeweller’s eyes during a failed robbery attempt.

 

esakal

Trending News

Jewellery Shop Robbery Video : ज्वेलरी शॉप लुटण्यासाठी महिलेने दुकानादारांच्या डोळ्यात फेकलं तिखट, पण तिथंच पकडली गेली अन् मग...

Jewellery Shop Robbery Woman Caught : मात्र तरीही दुकानादाराने याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही; जाणून घ्या, ही घटना नेमकी कुठं घडली

Mayur Ratnaparkhe

woman caught after attacking shopkeeper with chili powder : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका महिलेने दागिन्यांच्या दुकान लुटण्याच्या उद्देशाने प्रवेश केला. यानंतर मग दुकानदार एकटाच असल्याचे पाहून संधी मिळताच त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दागिने घेऊन पळून जाण्याचा तिचा प्लॅन होता. मात्र त्या महिलेचा डाव तिच्यावरच उलटला.

त्या महिलेने मिरची पावडर दुकानदाराच्या चेहऱ्यावर फेकली खरी परंतु दुकानदाराने त्याच क्षणी तिला पकडलं अन् दणादणा चापटा मारत, दुकानाबाहेर नेलं. हा सर्व प्रकार दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शिवाय, आता या घटनेचा व्हिडिओही तुफान व्हायर होत आहे.

दुकानदाराने अवघ्या २५ सेकंदातच जवळपास २५ चापटा त्या महिलेला लगवल्या आणि तिचे केस धरून तिला दुकानाबाहेर नेलं. प्राप्त माहितीनुसार अहमदाबादच्या रानीप भाजी मार्केटजवळील सोन्या-चांदीच्या दुकानात ही घटना ३ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.

ही महिला तोंड बांधून दुकानात आली होती, त्यानंतर तिने दुकानदार एकटा असल्याचे पाहून आणि दुकानातील दागिन पळवण्याच्या उद्देशाने त्याच्यावर मिरची पावडर फेकली. परंतु दुकानदाराच्या डोळ्यात ती गेली नाही, सगळा प्रकार दुकानदाच्या क्षणात लक्षात आल्याने दुकानादाराने त्याच क्षणी त्या महिलेला काउंटरवरून उडी घेत पकडले.

याप्रकऱणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानदाराने घटनेची तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. परंतु आता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्या महिलेचा शोध सुरू आहे. दुकानदार का तक्रार दाखल करत नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

"तक्रारदाराला त्याचा जबाब घेण्यासाठी दोनदा प्रत्यक्ष भेटण्यात आले आणि तक्रार दाखल करण्यास सांगितले गेले. परंतु तक्रारदार या प्रकरणात तक्रार दाखल करण्यास तयार नाही. तथापि, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे," असे अहमदाबाद पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PMC Recruitment : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT