Lord Shree ram Sakal
Trending News

Lord Shree Ram Photo : वयाच्या २१ व्या वर्षी प्रभू श्रीराम कसे दिसायचे?

सोशल मीडियावर हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

वैष्णवी कारंजकर

सोशल मीडियावर प्रभू श्रीराम यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रभू श्रीराम जेव्हा २१ वर्षांचे होते, तेव्हाचा आहे, असा दावा करण्यात येत आहे. या फोटोचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

हा फोटो आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. हा फोटो प्रभू श्रीराम २१ वर्षांचे असतानाचा आहे, असा दावा केला जात आहे. एक साधा फोटो आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये श्रीराम हसताना दिसत आहेत.

हा फोटो वाल्मिकी रामायण, रामचरितमानस तसंच अन्य ग्रंथांमध्ये असलेल्या वर्णनावरुन तयार करण्यात आला असल्याचं काही नेटकऱ्यांनी सांगितलं आहे. सोशल मीडियावर हा फोटो कौतुकाचा विषय ठरत आहे. इतकं हँडसम जगात कोणी जन्मालाही नाही आलं, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

हा फोटो कोणी बनवला आहे, हे मात्र अद्याप लक्षात आलेलं नाही. मात्र या फोटोचं चांगलंच कौतुक होत आहे. या आधीही असे अनेक फोटो समोर आले आहेत. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांचेही असे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या आधारे बनवलेले फोटो व्हायरल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT